ब्राझिलचा माजी महान खेळाडू रोनाल्डिन्होने त्याच्या कारकिर्दीत 200 पेक्षा जास्त गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने 1997मध्ये 17-वर्षाखालील फिफा विश्वचषकामार्फत प्रवेश केला.
या स्पर्धेतील कामगिरीमुळे तो देशासाठी खेळणारा आणि फुटबॉलच्या इतिहासातील उत्कृष्ठ खेळाडू ठरला. रोनाल्डिन्होचे हे कौशल्य वयाच्या 13व्या वर्षीच दिसून आले.
त्यावेळी रोनाल्डिन्होने स्थानिक संघाकडून खेळताना एकाच सामन्यात 23 गोल करून तो सामना 23-0ने जिंकून दिला. त्याच्या या खेळाविषयी तो जगात तर प्रसिद्ध झालाच पण मिडीयानेही त्याचे चांगलेच कौतूक केले.
ब्राझिलकडून खेळण्यापूर्वी त्याला ग्रिमियो युवा संघाने करारबद्ध केले. 2002च्या फिफा विश्वचषकातील विजेत्या संघात तो होता. यामध्ये त्याने 5 सामन्यात 2 गोल केले होते.
ब्राझिलसाठी त्याने 2002च्या फिफा विश्वचषकासोबत कोपा अमेरिका आणि फिफा कॉन्फिडरेशन चषक असे तीन आंतरराष्ट्रीय चषक जिंकले आहेत.
2005मध्ये रियल माद्रिद विरुद्ध खेळताना त्याने बार्सिलोनासाठी 2गोल करून सामना 3-0ने जिकूंन दिला. यावेळी रियलच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या.
तो बार्सिलोना बरोबरच पॅरीस-सेंट जर्मन, मिलॅन, फ्लॅमेन्गो इतर अशा फुटबॉल क्लबकडून खेळला आहे. यात त्याने बार्सिलोनाकडून खेळताना 94 गोल केले.
तसेच एका पत्रकार परिषदेत पेप्सी प्यायल्याने त्याला कोका-कोला सोबतचा 750,000डॉलरचा करार गमवावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–स्वीडनच्या या फुटबॉलपटूला बेकहॅमच्या म्हणण्यानुसार घालावी लागेल इंग्लंडची जर्सी
–रोनाल्डोमुळे इटालियन फुटबॉलमध्ये बदल घडतील- नेमार