चॅम्पियन्स लीगमध्ये वॅलेन्सिया विरुद्धच्या सामन्यात युवेंटसचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला रेड कार्ड मिळाले. यामुळे तो रडतच मैदानाबाहेर पडला.
युवेंटसकडून या लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या रोनाल्डोला या लीगचे 154 सामने खेळल्यावर पहिले तर कारकिर्दीतील 11वे रेड कार्ड मिळाले. या सामन्याच्या 29व्या मिनिटाला ही घटना घडली.
चॅम्पियन्स लीगमध्ये तीन वेगवेगळ्या क्लबकडून खेळताना चालू सामन्यात रडणारा रोनाल्डो हा पहिलाच फुटबॉलपटू ठरला आहे.
यावेळी रोनाल्डोने वॅलेन्सियाचा डिफेंडर जेसन मुरिल्लोला लाथ मारली तसेच त्याचे केस ओढले यामुळे त्याला रेड कार्ड मिळाले. प्रीमियर लीगप्रमाणे येथे रेड कार्डमुळे तीन सामन्यांची बंदी नसणार आहे तर युरोपियन फुटबॉल अधिकारी त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणार आहे. यासाठी रोनाल्डोला 27 सप्टेंबरला युफाच्या अधिकाऱ्यांसमोर जायचे आहे.
Cristiano #Ronaldo’s red card incident. Listen to the commentators right at the end. #UCL pic.twitter.com/1GoGrRPk18
— Sam Baig (@iSamBaig) September 19, 2018
मात्र रोनाल्डोला पुढच्या सामन्यास मुकावे लागणार हे नक्की आहे. रोनाल्डोच्या संघ सहकाऱ्यांच्या मते ही घटना खुप विचित्रच होती.
“जर हे झाले नसते तर कदाचित आम्ही 2 अधिक गोल केले असते. यामुळे 2016मध्ये लायनसोबत झालेल्या घटनेची आठवण झाली”, असे मिरालेम जॅनिच म्हणाला.
हा सामना युवेंटसने 2-0 असा जिंकला. यावेळी जॅनिचने 45व्या आणि 51व्या मिनिटाला पेनाल्टीत हे दोन गोल केले. तर वॅलेन्सियाकडून दॅनी पॅरेजोला गोल करण्याची संधी होती पण तो थोडक्यात गोल करण्यास मुकला.
रोनाल्डोने या लीगच्या 78 साखळी फेरीच्या सामन्यात 60 गोल केले आहेत.
तसेच युवेंटस विरुद्धचा पुढचा सामना यंग बॉइज आणि मॅंचेस्टर युनायटेड विरुद्ध आहेत. युनायटेडही एक सामना जिंकला असून ते आणि युवेंटस संयुक्तपणे ग्रुप एचमध्ये पहिल्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल
–धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव