फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्कार नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहीर केली आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरचे नावच नाही.
पॅरीस-सेंट जर्मनचा हा फुटबॉलपटू दुखापतीमुळे या वर्षातील काही महिने सामने खेळलाच नव्हता. तसेच रशियात झालेल्या फिफा विश्वचषकातील त्याची कामगिरी निराशाजनकच होती. यामुळेच त्याचा संघ उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमकडून पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर पडला.
तसेच त्याने खेळलेल्या फिफा विश्वचषकातील चार सामन्यात मिळुन तब्बल १४ मिनिटांचा वेळ वाया घालवला.
फिफा 2018चा गोल्डन बूट पटकावलेला हॅरी केन आणि उपविजेता क्रोएशिया संघाचा गोल्डन बॉल विजेता लुका मॉड्रिच यांचा या यादीत समावेश आहे.
OFFICIAL | The nominees for #TheBest FIFA Men’s Player 2018:
Cristiano Ronaldo
Kevin De Bruyne
Antoine Griezmann
Eden Hazard
Harry Kane
Kylian Mbappe
Lionel Messi
Luka Modric
Mohamed Salah
Raphael VaraneFor the period 3 July 2017-15 July 2018 pic.twitter.com/bqt8tDWY8d
— FIFA (@FIFAcom) July 24, 2018
तसेच यामध्ये केविन डी ब्रुने आणि एडन हझार्ड या बेल्जियमच्या दोन फुटबॉलपटूंचा समावेश आहे. तर इजिप्त आणि लीव्हरपूलचा मोहम्मद सलाह हा पण या पुरस्काराच्या शर्यतीत आहे.
फुटबॉलचे दिग्गज क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी सोबत फिफा विश्वचषक 2018 विजेत्या फ्रान्सचे राफेल वॅराने हा एकमेव डिफेंडर आणि एंटोनी ग्रिझमन यांचाही समावेश आहे.
फिफा 2018 सर्वोत्कृष्ठ पुरस्कार पुरूष खेळाडू-
क्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी, कायलिन एमबाप्पे, हॅरी केन, लुका मॉड्रिच, मोहम्मद सलाह, राफेल वॅराने, एडन हझार्ड, एंटोनी ग्रिझमन, केविन डी ब्रुने
विजेत्या फुटबॉलपटूचे नाव लंडन येथे 24 सप्टेंबरला घोषित केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर
–रोनाल्डोचा फिटनेस वीस वर्षाच्या तरूण फुटबॉलपटूसारखा