IND vs ENG 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला हैद्राबादमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी सगळ्यांच्या नजरा इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रुट याच्या कामगिरीवर होती. परंतू रुटला मात्र समाधानकारक कामगिरी करता आली नाही. परंतू त्याने भारताविरुद्ध मोठा पराक्रम केला आहे.
भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना 1932 साली खेळला होता. भारताविरुद्ध 1196 क्रिकेटर आजपर्यंत क्रिकेट खेळले आहेत. परंतू या 92 वर्षांत भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम हा ज्यो रुटच्या नावावर झाला आहे. रुटने भारताविरुद्ध खेळताना 26 सामन्यांत 62.31च्या सरासरीने 2555 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 9 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट रिकी पॉटिंगसह अव्वल स्थानी आला आहे. पॉटींगने भारताविरुद्ध 29 कसोटी सामन्यात 2555 धावा केल्या होत्या. (Root breaks 92-year-old record becomes India’s most troublesome cricketer)
भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (Most Test Runs against India)
2555- रिकी पॉटिंग
2555- ज्यो रुट
2431- ॲलस्टर कूक
2344- क्लाईन लॉईड
2228- जावेद मियांदाद
2171- शिवनारायण चंद्रपॉल
2049- मायकेल क्लार्क
2042- स्टिवन स्मिथ
हेही वाचा
IND vs ENG: आता जडेजाला ‘सर’ म्हणायला हरकत नाही, केलाय न मोडता येणारा विक्रम
कहर झाला! रन काढले 6, दिले 5, IND-ENG कसोटीत घडली अजब घटना