श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना लाॅर्डच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात जो रूटने (Joe Root) दुसऱ्या डावात शतक झळकावून इतिहास रचला आहे. पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर रूटने दुसऱ्या डावात 103 धावांची शानदार खेळी केली. अशाप्रकारे जो रूटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 50 शतके पूर्ण केली आहेत. यासोबतच रूट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 9व्या क्रमांकावर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या स्थानावर आहे. तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं आहेत. तेंडुलकरनंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतकांचा टप्पा ओलांडला आहे. या दोन भारतीय दिग्गजांनंतर रिकी पाँटिंग (Ricky Ponting) तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 71 शतकं झळकावली आहेत.
सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) चौथ्या स्थानावर आहे. त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 63 शतकं झळकावली. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस 62 शतकांसह पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम अमलाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 55 शतकं आहेत. हाशिम आमला सहाव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने 54 शतकांसह सातव्या स्थानावर आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा (Brian Lara) आठव्या क्रमांकावर आहे. मात्र, आता इंग्लंडचा जो रूट (Joe Root) नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रूटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 50 शतकांचा टप्पा पूर्ण केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ENG vs SL: जो रूटची तोडफोड कामगिरी सुरूच, शतकं ठोकून रचला इतिहास
ऐतिहासिक…! टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा ‘हा’ एकमेव भारतीय
BAN vs PAK: बाबर आझम पुन्हा ढेपाळला, चाहत्यांनी दिला निवृत्तीचा सल्ला