बर्मिंगहॅम | इंग्लंडचे माजी कर्णधार माइक ब्रेयरली यांच्यामते भारताचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे.
मातेर जो रुट कोहलीपेक्षा जास्त समजुतदार आहे असे मत माइक ब्रेयरलींनी व्यक्त केले आहे.
“सध्या इंग्लंडचा कर्णधार जो रुट कोहलीपेक्षा चांगला फलंदाज नाही मात्र रुटला कोहलीपेक्षा खेळाची जास्त समज आहे. जो रुटला त्याच्या चांगल्या सुरवातीची मोठ्या खेळीत रुपांतर करायला विराटकडून शिकायला हवे.” असे माइक ब्रेयरली म्हणाले.
तसेच ब्रेयरलींनी पुढे बोलताना विराट कोहलीने त्याच्या आतंररीष्ट्रीय क्रिकेट कीरकिर्दीत केलेल्या कामगिरीचे कौतूक देखील केले.
“मला आटते आजच्या घडीला विराटपेक्षा जगात कोणीही उत्तम फलंदाज नाही. जो फलंदाज क्रिकेटच्या सर्व प्रकारात ५० पेक्षा जास्तीच्या सरासरीने धावा करतो त्याच्यामध्ये काहीतरी खास गोष्ट असणारच. कोहलीला परिस्थितीनुसार फलंदाजीत बदल करता येतो त्यामुळे त्याला यश मिळत आहे.”
विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हार न मानणारा आहे. तसेच भारताच्या गोलंदाजीती आक्रमनाने ब्रेयरली प्रभावीत झाले आहेत. तसेच भारतीय संघात हा बदल विराट कोहलीमुळेच घडला आहे. असेही माइक ब्रेयरली पुढे म्हणाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-विजेतेपदासाठी एफसी पुणे सिटी संघ सज्ज-गौरव मोडवेल
-कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन