---Advertisement---

IND vs ENG: रूट किंवा यशस्वी नाही, मायकेल वॉनने ‘या’ खेळाडूला निवडले कसोटी मालिकेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज!

On: रविवार, ऑगस्ट 10, 2025 4:44 PM
---Advertisement---

ओव्हलमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, इंग्लंडविरुद्धची अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी (Anderson Tendulkar Trophy) 2-2 अशी बरोबरीत संपवल्यानंतर टीम इंडिया (team india) जल्लोषात बुडाली. 5 सामन्यांची चढ-उतारांनी भरलेली कसोटी मालिका भारताने जिंकलेला अखेरचा सामना हा केवळ निकाल नव्हता, तर शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या नव्या युगाची सुरुवात होती.

ओव्हल कसोटीच्या अखेरच्या दिवशी थरारक वातावरणात मोहम्मद सिराजच्या (Mohmmed Siraj) जादुई 5 विकेट्समुळे भारताने केवळ 6 धावांनी इंग्लंडला हरवत सामना जिंकला आणि मालिका बरोबरीत ठेवली. मालिका संपली असली तरी तिचा उत्साह अजूनही जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांमध्ये चर्चेचा विषय आहे.

अलीकडेच माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉन (Micheal Vaughan) यांना या मालिकेबाबत विचारले असता, त्यांच्या उत्तराने चाहत्यांमध्ये चर्चा रंगली. भारत-इंग्लंड मालिकेत अनेक नामांकित फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केल्या, पण वॉन यांच्या मते मालिकेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज दुसरा कोणी नसून शुबमन गिल (Shubman gill) ठरला.

गिलने अवघड परिस्थितीत संयम, तंत्र आणि आक्रमकता यांचा सुंदर समतोल साधत खेळ केला. इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध आत्मविश्वासाने धावा करत त्याने अनेक महत्त्वाच्या क्षणी भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले.
भारताच्या कसोटी कर्णधार म्हणून गिलचा हा पहिला सामना इंग्लंडमध्ये बरोबरीत संपला आणि 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी झाली. यासोबतच, गिल ह्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 10 डावांत 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या, ज्यात 4 शतकांचा समावेश होता. त्यामुळे त्याला भारताचा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ म्हणून गौरवण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---