न्यूझीलंडच्या यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या रॉस टेलरला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने आपल्या दमदार फलंदाजीने अनेक सामन्यांमध्ये किवी संघाला विजयाकडे नेले आहे. अर्थात यावेळी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात त्याचा समावेश झालेला नाही. त्याच्या खेळण्याच्या शैलीपासून ते शतक झळकावल्यानंतरच्या आनंदोत्सवापर्यंत सगळ्या बाबतीत त्याचा एक वेगळाच अंदाज असतो. त्याची ही जीभ बाहेर काढून शतक साजरे करण्याची पद्धत लोकांनाही खूप आवडते.
रॉस टेलरने त्याच्या शतकानंतर प्रेक्षकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बॅट उंचावताना त्याच्या तोंडातून जीभ बाहेर काढल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अर्थात प्रत्येक शतकानंतर त्याला योगायोग म्हणता येणार नाही. तो हे जाणूनबुजून करतो आणि त्याने एकदा त्यामागची गोष्ट देखील सांगितली होती.
एकदा पर्थ, ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळताना टेलरने द्विशतक झळकावले. यानंतर त्याला विचारण्यात आले की तुम्ही शतकानंतर जीभ का बाहेर काढता? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने एक मजेशीर किस्सा सांगितला. टेलर म्हणाला, की जेव्हा त्याने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे एकदिवसीय शतक केले तेव्हा अनेक क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले होते. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक झेल सोडत, तेव्हा तेव्हा त्याची जीभ बाहेर येत असे. त्याची मुलगी मॅकेन्झीला हे जाम आवडलं, त्यानंतर त्याने शतकानंतर आपल्या मुलीला खूश करण्यासाठी जीभ बाहेर काढून अभिवादन वा शुभेच्छा स्वीकारण्यास सुरुवात केली. चाहत्यांनाही त्याची ही ‘शैली’ आवडायला लागली आणि त्यानंतर त्याची ही ओळखच बनली.
रॉस टेलरने आपल्या झुंजार फलंदाजीने न्यूझीलंड संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे, परंतु ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याला किवी संघाचा भाग बनवले गेले नाही. टेलरला या वेळी संघातून वगळण्यात आले आहे.
न्यूझीलंड संघाच्या पुढील काही दौऱ्यांसाठी संघांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. पुढील चार महिने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत विविध संघांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये टी -20 विश्वचषकाचा संघाची घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषकासाठी संघ घोषित करणारा न्यूझीलंड हा पहिला देश ठरला आहे. केन विल्यमसन्स हा न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये, ‘हे’ ४ महारथी ठरु शकतात मॅचविनर