---Advertisement---

शेवटच्या सामन्यात राष्ट्रगीत म्हणताना रॉस टेलरच्या डोळ्यातून वाहिली अश्रूंची गंगा, भावूक Video व्हायरल

Ross-Taylor
---Advertisement---

हॅमिल्टन। सोमवारी (४ एप्रिल) न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात आला. सेडन पार्क येथे झालेला हा सामना न्यूझीलंडने ११५ धावांनी जिंकला. हा सामना न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू रॉस टेलरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. त्यामुळे तो या सामन्यापूर्वी राष्ट्रगीतावेळी खूप भावूक झालेला दिसला.

अन् रॉस टेलर रडू लागला
सोमवारी सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंड आणि नेदरलँड्स संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर उतरले होते. यावेळी रॉस टेलरबरोबर त्याची तीन मुलेही त्याच्याबरोबर होती. ज्यावेळी राष्ट्रगीत सुरू झाले, त्यावेळी टेलरला आपले अश्रू अनावर झाले. तो सोमवारी न्यूझीलंडच्या जर्सीमध्ये अखेरच्यावेळी राष्ट्रगीतासाठी उभा होता. राष्ट्रगीत संपल्यानंतर तो त्याचे डोळ पुसतच पुन्हा ड्रेसिंगरुमकडे परतला. तसेच अखेरच्या सामन्यासाठी उतरलेल्या टेलरप्रती दोन्ही संघांकडून अभिवादनही करण्यात आले.

सध्या टेलर भावूक झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच यावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत (Ross Taylor gets emotional before final match).

टेलरला विजयी निरोप
खरंतर टेलरने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. त्याने जानेवारी २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी न्यूझीलंडने एक डाव आणि ११७ धावांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे या सामन्यात टेलरने गोलंदाजीही केलेली आणि बांगलादेशची अखेरची विकेटही घेतलेली.

योगायोग म्हणजे, टेलर त्याच्या अखेरच्या वनडे सामन्यातही प्रतिस्पर्धी संघाची अखेरची विकेट घेण्यात सहभागी होता. त्याने नेदरलँड्सच्या आर्यन दत्तचा झेल मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर घेतला. या झेलसह न्यूझीलंडने नेदरलँड्सला वनडे मालिकेत व्हाईटवॉश दिला आणि टेलरला विजयी निरोप दिला.

https://twitter.com/sparknzsport/status/1510802020974088192

रॉस टेलरची कारकिर्द
न्यूझीलंड (Cricket New Zealand) संघातील दिग्गज आणि विश्वासू फलंदाज रॉस टेलर याने आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केलेत. त्याने ११२ कसोटी सामन्यांमध्ये ४४.६६ च्या सरासरीने ७६८३ धावा केल्या. यामध्ये त्याने १९ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली. तर २३६ वनडे सामन्यांमध्ये ४७.५५ च्या सरासरीने ८६०७ धावा केल्या. यामध्ये त्याने २१ शतके आणि ५१ अर्धशतके केली आहेत आणि १०२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १९०९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड संघासाठी कसोटी क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा रॉस टेलरच्या नावे आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केशव महाराजने बांगलादेशच्या फलंदाजांची उडवली दाणादाण, दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या कसोटीत २२० धावांनी विजय

रिषभची दिल्ली फ्रँचायझी बनणार आणखी मजबूत, ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज लवकरच उतरणार मैदानात

पंजाबच्या यष्टीरक्षकाने पदार्पणातच दाखवली हुशारी अन् बाद झाला धोनी, पाहा Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---