नवी दिल्ली। न्यूझीलंड संघाचा स्टार फलंदाज रॉस टेलरने म्हटले आहे की, तो पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळेल की नाही याबद्दल त्याला माहित नाही. आयसीसीने या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० विश्वचषक कोरोना व्हायरसमुळे स्थगित केला आहे. जो २०२२ मध्ये होणार आहे. तसेच भारतात पूर्वीच ठरल्याप्रमाणे पुढील वर्षी टी२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे.
याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात टेलर (Ross Taylor) न्यूझीलंड संघाकडून १०० टी२० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे तसेच तो पुढील वर्षी ३७ वर्षांचा होणार आहे. त्याने ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “माहित नाही. वयानुसार तुम्ही आळशी होता. परंतु तुमचा सराव, अनुभव आणि मन महत्त्वपूर्ण ठरते.”
कॅरेबियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी गेलेला टेलर म्हणाला, “सर्वकाही विचित्र आहे. इतक्या दीर्घ काळापर्यंत क्रिकेटपासून कधीच दूर राहिलो नाही. आयसोलेशन आणि आता जे आहे ते विचित्र आहे. टी२० क्रिकेटमध्ये आम्हाला प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडिअममध्ये खेळण्याची सवय आहे. मोकळ्या मैदानावर खेळणेही विचित्र आहे. परंतु याची सवय लावावी लागेल.
टेलरने न्यूझीलंड संघाकडून १०१ कसोटी सामने, २३२ वनडे सामने आणि १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४६.१० च्या सरासरीने ७२३८ धावा केल्या आहेत. यामध्ये १९ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर वनडेत त्याने ४८.४४ च्या सरासरीने ८५७४ धावा केल्या आहेत. त्यात २१ शतके आणि ५१ अर्धशतकांचा समावेश आहे.
सोबतच त्याने टी२०त २६.५१ च्या सरासरीने १९०९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ७ शतके ठोकली आहेत. याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमध्येही ५५ सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे
-मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी
-आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं
-फलंदाजांना रडकुंडीला आणणारे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ५ सर्वात यशस्वी गोलंदाज