कोरोना महामारीमुळे ७-८ महिने क्रिकेट खेळू न शकलेला न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर पुन्हा एकदा मैदानावर जाण्यास तयार झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या टी -२० आणि कसोटी मालिकेत क्रिकेट प्रेमींना रॉस टेलरच्या खेळाचा आनंद घेता येणार आहे. या मालिकांदरम्यान एक खास विक्रम करण्याची संधी टेलरला आहे.
रॉस टेलरने आतापर्यंत न्यूझीलंड संघातर्फे एकूण ४३३ आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे तो सध्या न्यूझीलंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक अंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम माजी कर्णधार डॅनियल विट्टोरीच्या नावावर आहे. डॅनियलने आतापर्यत ४३७ अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.
त्यामुळे जर टेलर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिनही टी२० आणि २ कसोटी सामन्यात खेळला तर तो विट्टोरीचा हा विक्रम मागे टाकू शकतो.
याबद्दल बोलताना रॉस टेलर म्हणाला, ‘मला अजूनही हा विक्रम पूर्ण करायचा आहे. माझे मार्गदर्शन मार्टिन क्रो नेहमी म्हणायचे विक्रम हे तोडण्यासाठी बनलेले असतात. ज्याला संधी मिळते तो विक्रम तोडत असतो. भविष्यात माझ्या संघासाठी किती ही सामने खेळलो तरी मला अपेक्षा आहे की केन विलियमसन अथवा इतर कोणत्या ही खेळाडूने हा विक्रम तोडावा.’
रॉस टेलरने वेस्टइंडीज विरुद्ध २००६ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने न्यूझीलंड संघाकडून १०१ कसोटी सामने, २३२ वनडे सामने आणि १०० टी-२० सामने खेळले आहेत.
टेलर विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यात देखील न्यूझीलंड संघाचा सदस्य राहिला असून २०२३ चा विश्वचषक जिकंण्याचे त्याचे लक्ष्य आहे. आम्ही निश्चित २०२३ चा विश्वचषक जिंकू अशी अपेक्षा ही त्याने यावेळी व्यक्त केली. रॉस टेलर हा जागतिक कीर्तीचा एक खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने आता पर्यत अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
…तर भारतीय संघाला एकही कसोटी सामना जिंकता येणार नाही, मायकल क्लार्कची भविष्यावाणी
टी२०, कसोटी मालिकेआधीच न्यूझीलंडचे दोन स्टार खेळाडू पडले बाहेर; सँटेनर करणार नेतृत्व
जेव्हा ‘मुंबईकर’ सचिन तेंडुलकर रस्ता चुकल्यावर साधतो रिक्षाचालकाशी मराठीतून संवाद, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची
विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक
क्रिकेट इतिहासातील ३ सर्वात वादग्रस्त पंच, ज्यांचा पाकिस्तानशी आहे संबंध