पुणे ।ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत. अमित रुथ, चेतन गदीयार, यशराज दळवी , सर्वेश बिरमाने, सॅम चावला, अनिष लाल , प्रणित कुदळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात अमित रुथने ओजस दबसचा 1-6, 6-4, 7-6(2) असा टायब्रेकमध्ये पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. यशराज दळवीने धृगन बोंद्रेचा 6-1, 6-1 असा तर सर्वेश बिरमानेने अर्जुन शिरगावकरचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत मुख्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-अंतिम पात्रता फेरी- मुले
अमित रुथ वि.वि ओजस दबस 1-6, 6-4, 7-6(2)
चेतन गदीयार वि.वि आयुष भंडारी 6-3, 6-2
यशराज दळवी वि.वि धृगन बोंद्रे 6-1, 6-1
सॅम चावला वि.वि कनव गोयल 6-2, 6-1
सर्वेश बिरमाने वि.वि अर्जुन शिरगावकर 6-3, 6-2
अनिष लाल वि.वि प्रथम भुजबळ 6-1, 6-2
प्रणित कुदळे वि.वि वकुल नाथ 6-4, 6-0
स्पर्धेची मानांकन यादी- मुले
1. सुशांत दबस(हरियाणा), 2. डेनिम यादव(मध्य प्रदेश), 3. उदित कंबोज(हरियाणा), 4. आर्यन भाटीया(महाराष्ट्र), 5. राजेश कन्नन(तमिळनाडू), 6. उदित गोगोई(आसाम), 7. गौरव गुलीया(हरियाणा), 8. सोनु खान(हरियाणा)
मुली- 1. सुदिप्ता कुमार(महाराष्ट्र), 2. बेला ताम्हणकर(महाराष्ट्र), 3. संस्कृती दमेरा(तेलंगणा), 4. गार्गी पवार(महाराष्ट्र), 5. पावनी पाठक(तेलंगणा), 6. हरिनी पार्थीबन(तमिळनाडू), 7. आर्णी रेड्डी येल्लु(तेलंगणा), 8. आयरा सुद(तेलंगणा)