सी फॉरेस्ट वॉटरवेवर या भारतीय जोडीने ही स्पर्धा ६:२४:४१ या वेळेत पूर्ण केली आणि ते ६ बोटींच्या शर्यतीत शेवटच्या स्थानी राहिले. विश्वविजेत्या आयर्लंड संघाचे फिन्टान मॅककार्थी आणि पॉल ऑडोनाोव्हनने ही शर्यत ६:०५:३३ या वेळेत पूर्ण करत जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. दुसरीकडे इटलीच्या स्टीफानो ओप्पो आणि पिट्रो रुटाने ही शर्यत ६:०७:७० या वेळेत पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला. (Rowing Tokyo Olympics 2020 India Men Lightweight Double Sculls Semi Final Result)
बेल्जियमच्या निल्स व्हॅन झांडवेघे आणि टिम ब्रायसने ही शर्यत ६:१३:०७ या वेळेत पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला. हे तिन्ही संघ गुरुवारी पदकाच्या राऊंडमध्ये अंतिम एमध्ये प्रवेश करतील.
दुसरीकडे अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंगने चांगली सुरुवात केली होती आणि सुरुवातीच्या टप्प्यात अव्वल ३मध्ये होते. मात्र, शर्यत जस-जशी पुढे सरकली, भारतीय रोव्हर्स जोडीने आपली गती कायम राखली नाही, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय रोव्हर्स जोडी ऑलिंपिकमध्ये क्रमवारी निश्चित करण्यासाठी गुरुवारी (२९ जुलै) अंतिम ‘बी’ मध्ये स्पर्धा करेल.
अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंगने टोकियो ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे. आपल्या हीटमध्ये त्यांनी ६:४०:३३ इतका वेळ घेतला. या कामगिरीच्या जोरावर ते ५ वा क्रमांक पटकावण्यात यशस्वी झाले.
रेपेचेसमध्ये भारतीय रोव्हर्स खूपच सावकाश असल्याचे दिसले. असे असूनही ६:५१:३६ या वेळेत फिनिश लाईन पार करत त्यांनी उपांत्य फेरीसाठी प्रवेश मिळवला होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?