इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने त्यांच्या नवीन लोगोचे आज(14 फेब्रुवारी) अनावरण केले आहे. बुधवारी आरसीबीने त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवरील प्रोफाईल पिच्चर, पोस्ट काढून टाकल्या होत्या. याबद्दल आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीसह युजवेंद्र चहल आणि एबी डिविलियर्स यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.
पण आरसीबीने काल(13 फेब्रुवारी) ‘नवीन दशक, नवीन आरसीबी’ अशा वाक्याची एक पोस्ट शेअर करत त्यांनी नवीन काहीतरी घेऊन येत असल्याची कल्पना सर्वांना दिली होती. त्यानुसार आरसीबीने आज त्यांच्या नवीन लोगोचे अनावरण केले आहे.
त्यांनी या लोगोचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. तसेच नंतर लोगोचा फोटोही शेअर केला. तसेच त्याआधी या लोगोमध्ये केलेल्या काही बदलांची माहितीही आरसीबीने त्यांच्या पोस्टमधून दिली. याबरोबरच त्यांनी 2008 पासून आत्तापर्यंत बदललेल्या लोगोंचाही व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.
THIS IS IT. The moment you've been waiting for. New Decade, New RCB, New Logo! #PlayBold pic.twitter.com/miROfcrpvo
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 14, 2020
A new chapter begins #PlayBold #NewDecadeNewRCB pic.twitter.com/tUp46ISTDH
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 14, 2020
आरसीबीच्या या नवीन लोगोमध्ये त्यांचा प्रमुखे लाल रंग बॅकग्राउंडला आहे. तसेच सोनेरी रंगाचा सिंह मागील 2 पायांवर उभा असून गर्जना करत आहे. तसेच त्याखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघाचे नाव लिहिलेले आहे.
Embodying the bold pride and the challenger spirit, we have unleashed the rampant lion returning him to the Royal lineage.
New Decade, New RCB, and this is our new logo #PlayBold #NewDecadeNewRCB pic.twitter.com/bdf1kvXYUl
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 14, 2020
आरसीबीने आत्तापर्यंत आयपीएलच्या सर्व 12 मोसमात सहभाग घेतला आहे. मात्र त्यांना विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. त्यांनी 2009, 2011 आणि 2016 असे तीन वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र तिन्हीवेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या नवीन दशकात त्यांना आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदाची आशा असेल.
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्यात पुन्हा रंगणार जंगी लढतhttps://t.co/fkcCmlrttv
— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020
"धोनीने भारतीय संघाचा चेहरा बदलला"
वाचा????https://t.co/hy99MoO8o7????#म #मराठी #Cricket #TeamIndia @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) February 13, 2020






