---Advertisement---

एकही आयपीएल आरसीबी जिंकली नाही, पण आरसीबीचे असे ३ विक्रम मात्र मुंबईलाही जमले नाहीत

On: सोमवार, ऑगस्ट 10, 2020 8:10 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी अद्यापपर्यंत चांगली झालेली नाही. आरसीबीने आतापर्यंतच्या १२ सीझनमध्ये एकदाही आयपीएल चषक जिंकलेला नाही. मात्र संघ फाइनलपर्यंत ३ वेळा पोहोचला आहे पण संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही.

आयपीएलमध्ये आरसीबीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. आरसीबीची फलंदाजी खूपच मजबूत आहे आणि या अशा वेळी त्यांनी बरेच विक्रम नोंदविले आहेत. आरसीबी संघाकडे एबी डिव्हिलियर्स आणि रन मशीन कोहली सारखे जबरदस्त फलंदाज आहेत. आरसीबी संघाचा नेहमीच त्यांच्या गोलंदाजीमुळे पराभव होत आला आहे. फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले आहेत परंतु अनेकदा खराब गोलंदाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयपीएलमध्ये आरसीबीकडून अनेक प्रकारचे विक्रम बनले आहेत जे येत्या आयपीएलमध्येही तुटणे खूप कठीण आहे. त्या विक्रमांपैकी ३ मोठे विक्रम कोणते ते जाणून घेऊया..

३. एक संघ म्हणून सर्वाधिक धावा-
ज्या सामन्यात ख्रिस गेलने ६६ चेंडूत १७५ विस्फोटक फलंदाजी केली, त्या सामन्यात आरसीबी संघाने पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्द सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. आरसीबीने त्या सामन्यात गेलच्या मदतीने २० षटकांत ५ बळींच्या मोबदल्यात २६३ धावा केल्या होत्या.

गेलची टी-२० इतिहासातील ही सर्वात मोठी खेळी आहे. त्या विक्रमपर्यंत अजून कोणता संघ पोचला नाही. तो विक्रम अजून अबाधीत असून तुटणे कठीण वाटते.

२. सामन्यात सर्वात कमी धावा
एक विक्रम असा आहे कि तो विक्रम कोणताही संघ तोडू शकणार नाही. आरसीबीच्या नावावर आयपीएलमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम तर आहेच परंतु याच संघाच्या नावावर सर्वात कमी धावसंख्या नोंदवण्याचाही विक्रम आहे.
२०१७ मधील आयपीएलमध्ये आरसीबी संघाने केकेआर विरुद्ध फक्त ४९ धावा केल्या होत्या.

१. आयपीएलमध्ये सर्वात मोठी भागीदारी
आयपीएल सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम आरसीबीच्याही नावावर आहे. २०१६ च्या आयपीएल मोसमात विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीने गुजरात लायन्सविरुद्धच्या दुसर्‍या विकेटसाठी २२९ धावांची विक्रमी भागीदारी केली.
त्याचबरोबर आयपीएलमधील दुसर्‍या क्रमांकाची भागीदारी करण्याचा विक्रमही याच जोडीच्या नावे आहे. २०१५ च्या मोसमात कोहली आणि डिव्हिलियर्स या जोडीने मुंबई इंडियन्स विरुद्ध दुसर्‍या विकेटसाठी नाबाद २०१५ धावांची भागीदारी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---