चेन्नईमध्ये गुरुवारी (१८ फेब्रुवारी) आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सर्वाधिक ८ खेळाडूंना खरेदी केले. आजवर एकदाही आयपीएल चषक न जिंकलेल्या या संघाने न्यूझीलंडचा गोलंदाज कायल जेमिसनला सर्वाधिक १५ कोटींना विकत घेतले. या ६ फूट ८ इंच उंची असलेल्या वेगवान गोलंदाजाच्या येण्याने बेंगलोरचे गोलंदाजी आक्रमण जास्त मजबूत बनले आहे.
तसेच बेंगलोरने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसाठी १४ कोटी २५ लाख रुपये खर्च केले. याबरोबरच सचिन बेबी आणि मोहम्मद अझरुद्दीन अशा युवा फलंदाजांना त्यांनी आपल्या गोटात सामील केले आहे. गतवर्षीचा आयपीएल हंगाम गाजवलेल्या युवा धुरंधर देवदत्त पड्डीकलप्रमाणे या खेळाडूंकडूनही संघाला दमदार फलंदाजी प्रदर्शनाची अपेक्षा असणार आहे.
यासह आयपीएल लिलावाआधी संघात कायम राखलेल्या आणि लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूंसह बेंगलोरच्या ताफ्यात एकूण २२ खेळाडू झाले आहेत. अशाप्रकारे येत्या हंगामात तगड्या संघासह आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी विराटचा बेंगलोर संघ प्रयत्नशील असेल.
https://twitter.com/RCBTweets/status/1362435401680527362?s=20
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – २२ खेळाडू (८ परदेशी)
लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनिएल सॅम्स
लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
काईल जेमिसन (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (१४.२५ कोटी), डॅन ख्रिस्तीन (४.८० कोटी), सचिन बेबी (२० लाख), रजत पाटिदार (२० लाख), मोहम्मद अझरुद्दीन (२० लाख), सुयश प्रभुदेसाई (२० लाख), कोना श्रीकर भरत (२० लाख)
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात ‘या’ खेळाडूंची झाली चांदी, फ्रँचायझींनी ओतला पाण्यासारखा पैसा
पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार? वाचा कारण
टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कोण आहे तो?






