आयपीएलचा मेगा लिलावाचा (IPL Mega Auction 2025) आज दुसरा दिवस सुरू आहे. मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीपासूनच अनेक मोठ्या खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली आहे. त्यात क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) हेही मोठे नाव होते. कृणाल पांड्याचे नाव लिलावाच्या टेबलावर येताच अनेक संघ त्याच्यावर बोली लावू लागले. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) क्रुणालला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
कृणाल पांड्याची (Krunal Pandya) मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याचे नाव समोर येताच त्याला दुप्पट बोलीपेक्षा जास्त रक्कम मिळेल असे सर्वांना वाटले आणि तेच झाले. चाहत्यांच्या आवडत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) क्रुणालचा संघात 5.75 कोटी रुपयांना समावेश करण्यात आला होता.
क्रुणाल आता आगामी हंगामापासून आरसीबीसाठी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. क्रुणाल पुन्हा एकदा त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पांड्याविरूद्ध (Hardik Pandya) आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. वास्तविक, हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार आहे. त्यामुळे हे 2 भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहेत.
कृणाल पंड्या आयपीएल 2024 पर्यंत लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) भाग होता. क्रुणाल फिरकी गोलंदाज आहे. कृणालला कर्णधारपदाचा देखील अनुभव आहे, अशा परिस्थितीत आरसीबी संघ त्याला कर्णधारपदाची मोठी जबाबदारी देऊ शकतो. क्रुणाल पांड्यानेही आरसीबीमध्ये सहभागी होऊन आनंद व्यक्त केला आहे. कृणालने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक ट्विट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
क्रुणाल पांड्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये 127 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 22.56च्या सरासरीने 1,647 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 132.82 राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याने केवळ 1 अर्धशतक झळकावले आहे. सोबतच त्याने 76 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहची ऑस्ट्रेलियात मोठी कामगिरी, दुसऱ्या महायुद्धानंतर हा पराक्रम करणारा केवळ दुसराच गोलंदाज!
सीएसकेचा स्टार गोलंदाज मुंबईकडून खेळणार! 18 वर्षीय खेळाडूवर खर्च केले कोट्यावधी रुपये
भुवी-कोहली एकत्र खेळणार! दिग्गज गोलंदाज आरसीबीच्या ताफ्यात






