आयपीएलच्या 16व्या हंगामात शनिवारी (6 मे) दोन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून मुंबई इंडिन्सला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. दिवसातील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिल्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने 7 विकेट्सने आरसीबीला पराभूत केले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आल्यानंतर आरसीबीने निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 16.4 षटकांमध्ये 182 धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीचा सलामीवीर फिल साल्ट मॅच विनर ठरला. सॉल्टने 45 चेंडूत 87 धावा केल्या. दुसरीकडे आरसीबीसाठी विराटने अर्धशतक केले होते. पण विराटची ही खेळी व्यर्थ गेली. (Royal Challengers Bangalore lost to Delhi Capitals)
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासाठी दिल्लीविरुद्धचा हा सामना खास ठरला. विराटने 46 चेंडूत 55 धावा केल्या. आयपीएल कारकिर्दीतील विराटचे हे 50वे शतक ठरले. सोबतच त्याने आपल्या 7000 आयपीएल धावाही पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये 7000 धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू ठरला आहे. असे असले तरी, आरसीबीला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीसाठी विराटव्यतिरिक्त महिपाल रोमरुर याने 54, तर डू प्लेसिसने 45 धावांची महत्वापूर्ण खेळी केली.
दिल्लीसाठी या सामन्यात डेविड वॉर्नरसोबत फिल सॉल्ट डावाची सुरुवात करण्यासाठी आला. पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. सॉल्टने या संधीचा फायदा घेत अवघ्या 45 चेंडूत 87 धावा कुटल्या. वॉर्नरला मात्र 22 धावांवर समाधान मानावे लागले. आरसीबीसाठी कर्ण शऱ्मा, जोश हेजलवूड आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. तसेच दिल्लीसाटी खलिल अहमद आणि मुकेश कुमार यांनी एक-एक विकेट घेतली. मिचेल मार्श याने 2 विकेट्स नावावर केल्या. मार्शने फलंदाजीतही 26 धावांचे योगदान दिले.
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्हाला भारतीय फलंदाजाची गरज…’, चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर कॅप्टन रोहितची मोठी प्रतिक्रिया
विक्रमी 7 हजार धावा करताना विराटने ‘या’ संघाविरुद्ध चोपल्या सर्वाधिक धावा, बलाढ्य CSK दुसऱ्या स्थानी