रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेतील 24वा सामना रंगला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी बेंगलोरच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला आहे. या सामन्यात चेन्नईने 18व्या षटकातच 200 धावांचा आकडा गाठला होता. विशेष म्हणजे, या धावा करण्यात अजिंक्य रहाणे, डेवॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. चेन्नईने या सामन्यात बेंगलोरपुढे 227 धावांचे आव्हान ठेवले.
या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या. तसेच, बेंगलोरला 227 धावांचे आव्हान दिले.
यावेळी चेन्नईकडून फलंदाजी करताना डावाची सुरुवात ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी केली होती. मात्र, ऋतुराजला मोठी खेळी करता आली नाही. तो वैयक्तिक 3 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर डेवॉन कॉनवे आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सांभाळला. त्यांच्यात 74 धावांची भागीदारी झाली. पुढे रहाणे 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर चौथ्या स्थानी आलेल्या शिवम दुबे याने संघासाठी 52 धावांची अर्धशतकी खेळी करत मोलाचे योगदान दिले. तसेच, कॉनवे हादेखील 83 धावा करून बाद झाला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईला 200 धावांचा आकडा पार करण्यात मदत झाली. या तिघांव्यतिरिक्त मोईन अली (नाबाद 19), अंबाती रायुडू (14) आणि रवींद्र जडेजा (10) यांनीही दोन आकडी धावसंख्या पार केली.
विसाव्या षटकाचा आढावा
सामन्यातील शेवटचे षटक खूपच रोमांचक झाले. बेंगलोरकडून 20वे षटक हर्षल पटेल टाकत होता. त्याने पहिला चेंडू जडेजाला टाकून एक धाव खर्च केली. त्यानंतर त्याने मोईन अली याला दुसरा चेंडू नो बॉल टाकल्यामुळे अतिरिक्त एक धाव दिली. त्यानंतर त्याच चेंडूवर जडेजाला एक धाव दिली. तिसऱ्या चेंडूवर मोईनला पुन्हा वाईड चेंडू टाकला. त्यानंतर गोलंदाज बदलण्यात आला. यावेळी ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजीसाठी आला. त्याला येताक्षणीच जडेजाने खणखणीत षटकार मारला. त्यानंतर मॅक्सवेलने चौथा चेंडू वाईड टाकला. पुढे त्याच चेंडूवर जडेजाला सबस्टिट्यूट प्रभूदेसाईकडून झेलबाद केले. पाचवा चेंडू खेळण्यासाठी एमएस धोनी मैदानात उतरला. त्याने एक धाव घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मोईन अलीने 1 धाव घेतली. अशाप्रकारे 20व्या षटकात एकूण 16 धावा चेन्नईच्या खात्यात जमा झाल्या. त्यामुळे चेन्नईने धावफलकावर 226 धावा लावल्या.
Innings Break!
It was raining boundaries in the first innings as @ChennaiIPL post a mighty total of 226/6!
Another high-scoring thriller on the cards? We will find out soon 😉
Scorecard ▶️ https://t.co/nvoo5Sl96y #TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/DpQbs56QQj
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना सहा गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. त्यात मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, विजयकुमार विषक, वनिंदू हसरंगा, ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेल यांचा समावेश होता. (Royal Challengers Bangalore Need 227 Runs to win against chennai super kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेने रहाणेवर लावलेली 50 लाखांची बोली, पण पठ्ठ्याकडून कोटींची कामगिरी; 3 डावात केल्या ‘एवढ्या’ धावा
आयपीएल निवृत्तीवर धोनीचं स्पष्टीकरण! म्हणाला, ‘मी असं केलं तर…’