मुंबई| इंडियन प्रीमियर लीग २०२२चा २२वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकत चेन्नईचा संघ त्यांचा हंगामातील पहिला विजय नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर बेंगलोरचा संघ पराभाचा चौकार मारण्यासाठी प्रयत्नशील असेल. विशेष म्हणजे, हा चेन्नईचा आयपीएलमधील २०० वा सामनाही आहे.
तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्यासाठी ७ वाजता या सामन्यासाठी नाणेफेक झाली आहे. बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
बेंगलोरच्या संघात एक महत्त्वपूर्ण बदल आहे. आपल्या बहिणीच्या मृत्यूमुळे घरी परतलेल्या वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या जागी जोश हेजलवुडला जागा दिली गेली आहे. हा त्याचा बेंगलोरकडून पहिलाच आयपीएल सामना असेल. तसेच युवा सुयश प्रभुदेसाई यालाही संधी दिले गेली आहे. दुसरीकडे चेन्नईच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
असे आहेत दोन्हीही संघ-
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, महेश थिक्षाणा, मुकेश चौधरी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई, आकाशदीप सिंग
महत्त्वाचया बातम्या-
‘धोनी ओपनिंग करून संघाला संकटातून काढू शकतो बाहेर’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे विधान
‘बोल, कधी सोडतोय नोकरी’, हार्दिकची फिफ्टी झाल्यावर नोकरी सोडणार म्हटलेला कार्यकर्ता जोरात ट्रोल
आरसीबी वि. सीएसके सामन्यापूर्वी मैदानात आली ‘फॅमिलीवाली’ फिलिंग; धोनी, विराट आणि फाफची गळाभेट