इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. या लिलावात सर्वच संघांनी आपल्याला गरज असलेल्या खेळाडूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघात सामील करून घेतले. आयपीएल 2022 चा विजेता संघ असलेल्या गुजरात टायटन्सनेदेखील मोजक्या मात्र चांगल्या खेळाडूंना संघाचा भाग बनवले. त्याचवेळी गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा व भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांच्यातील एका संवादाने चांगलेच लक्ष वेधून घेतले.
गुजरातने या लिलावात उत्कृष्ट कामगिरी करताना युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला. हा लिलाव ज्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केला जात होता, त्या प्लॅटफॉर्मसाठी अनेक माजी भारतीय खेळाडू एक्सपर्ट म्हणून काम पाहत होते. लिलावाच्या दरम्यान गुजरात चा मुख्य प्रशिक्षक असलेल्या नेहराने या आपल्या माझी संघ सहकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये सुरेश रैना, आरपी सिंग व रॉबिन उथप्पा यांचा समावेश होता. त्यावेळी आरपीने नेहराला प्रश्न विचारला की,
“तुम्ही उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांवर चांगलेच लक्ष ठेवले होते. मी देखील उत्तर प्रदेशचाच आहे. सध्या मी रिटायर झालो असलो तरी, तुमच्या सपोर्ट स्टाफमध्ये काहीतरी का मी येऊ शकतो का?”
त्यावर नेहराने हसून, “तू कोणत्याही संघासाठी कामी येऊ शकतो.” असे उत्तर दिले.
आरपी सिंग याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे. दुसरीकडे गुजरात संघात उत्तर प्रदेशसाठीच खेळत असलेल्या मोहम्मद शमी, यश दयाल व शिवम मावी यांचा समावेश आहे. शमी व दयाल हे मागील वर्षापासून संघाचा भाग आहेत. तर, या लिलावात मावीला 6 कोटींची रक्कम देत त्यांनी संघात सामील करून घेतले.
(RP Singh And Ashish Nehra Funny Conversation In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या सीएसकेने केला अपमान; आता भिडूने लिलावात साडेचार कोटी घेत रचला इतिहास
बीसीसीआयला वाटतेय भीती! आयपीएल संघांनी उचललेल्या ‘या’ पावलामुळे बोर्डाला फुटलाय घाम