---Advertisement---

‘मला नाही वाटत रोहितला विश्रांतीची गरज आहे’, ‘हिटमॅन’च्या माजी संघसहकाऱ्याचे मोठे विधान

On: रविवार, जून 5, 2022 7:30 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा १५वा हंगाम संपल्यानंतर सर्व भारतीय चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेची ओढ लागली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील काही दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या खेळाडूंंमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज विराट कोहली सह गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. एकाच वेळी संघातील इतक्या दिग्गजांना विश्रांती दिल्याने संघनिवडीवर ताशेरे ओढले जात आहेत. अशातच आता भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि रोहितचा माजी संघसहकारी आरपी सिंग याने याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.

एका वृत्तवाहिनीवरील संभाषणादरम्यान आरपी सिंग (RP Singh) म्हणाला की, “माझ्या मते रोहित शर्माने (Rohit Sharma) मालिका खेळायला हवी होती. विश्रांती घेणे किंवा न घेणे ही त्याची स्वतःची निवड आहे. तो किती थकला होता यावर ते अवलंबून आहे. पण मला वाटत नाही की, त्याला विश्रांतीची गरज आहे. तो खेळला पाहिजे कारण ही एक लांबलचक मालिका आहे आणि लक्षात ठेवा की तो कर्णधार देखील आहे.”

केवळ आरपी सिंगच नाही, तर भारतातील अनेक क्रिकेट चाहते दिखील रोहित आणि विराटला दिल्या गेलेल्या विश्रांतीमुळे नाराज आहेत. मात्र, या दोन्ही खेळाडूंचा आयपीएल हंगाम फारसा चांगला गेला नाही. त्यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळावी यासाठी ही विश्रांती आवश्यक असल्याचे अनेक क्रिकेट जाणकार सांगतात.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारतीय टी२० संघ
केएल राहुल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दिनेश कार्तिकसारख्या तगड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत शास्त्रींनी निवडली टी२० प्लेइंग ११, टाका नजर

भारतीय पठ्ठ्या ‘रावळपिंडी एक्सप्रेस’लाही देणार टक्कर, म्हणाला, ‘मी मोडणार अख्तरचा विक्रम, पण…’

“जर गांगुलीने माझी साथ दिली नसती, तर त्याला कर्णधारपद सोडावे लागले असते”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---