---Advertisement---

रिंकू सिंगचा झेल सोडल्याने आरआरला 96 लाख रुपयांचे नुकसान! नांद्रे बर्गरची चूक संघाला भोवली

On: सोमवार, एप्रिल 20, 2026 3:13 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१९ एप्रिल) ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यात सामना रंगला. यामध्ये आरआरने केलेली एक चूक सामना संघाला चांगलीच नुकसानीची ठरली आहे. त्यांनी हा सामना गमावण्याबरोबरच त्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. या सामन्यात आरआरने केकेआरला १५६ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते.

लक्ष्याचा पाठलाग करताना ११ व्या षटकात केकेआरच्या ७३ धावसंख्येवर ५ विकेट्स पडल्या होत्या. तेव्हा रिंकू सिंग ८ धावांवर खेळत होता आणि त्याला ११ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जीवनदान मिळाले. केकेआरची फलंदाजी फळी आधीच तंबूत परतली होती आणि अशा स्थितीत त्यांची आणखी एक विकेट पडली असती तर सर्व अवघड झाले असते. पुढे रिंकू खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५३ धावा केल्या. त्यामुळे हा सामना केकेआरने ४ विकेट्सने जिंकला. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रिंकूचा झेल सोडल्यामुळे आरआरला सुमारे ९६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या डावामध्ये रिंकूचा फलंदाजी प्रभाव ७६.३७ टक्के होता आणि झेल सोडल्यावर तो ६८.२८ टक्के झाला. म्हणजेच त्याच्या फलंदाजी प्रभावापैकी जवळपास ८९.४० टक्के प्रभाव आरआर झेल पूर्ण करता न आल्यानंतर आला. सोप्या भाषेत सांगायचे तर त्याच्या डावाचे जवळजवळ संपूर्ण मूल्य झेल सोडल्यानंतरचे होते. या सामन्यातील प्रत्येक प्रभाव बिंदूचे मूल्य १.४०४६ लाख होते. त्यामुळे रिंकूचा झेल सोडल्यानंतर फलंदाजी मूल्य ९५.९ लाख रुपये होते. ही झेल सोडल्याची आर्थिक किंमत आहे.

तसेच या हंगामात झेल घेण्यामध्ये आरआरची टक्केवारी उत्तम आहे. त्यांनी सोडलेला रिंकूचा झेल हा या हंगामातील त्यांचा तिसरा सोडलेला झेल ठरला आहे. त्यांची झेल घेण्याची टक्केवारी ९१.४ आहे, जी इतर संघांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे.

या सामन्यात आरआरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या केकेआरच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे आरआरची पहिल्या विकेटची भागीदारीच मोठी ठरली. त्यामध्ये वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जायस्वाल यांनी मिळून ८१ धावांची भागीदारी केली. वैभवने सर्वाधिक ४६ धावा आणि यशस्वीने ३९ धावा केल्या. त्यामुळे आरआरने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५५ धावा केल्या.

प्रत्युत्तरात केकेआरची सुरूवात विकेट्सने झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि टीम सेफर्ट शून्यावरच तंबूत परतले. कॅमेरॉन ग्रीन आणि अंगकृष रघुवंशीने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली, मात्र ग्रीन २७ धावा करत बाद झाला. त्यानंतर केकेआरच्या विकेट्स पडतच राहिल्या. रिंकूने अनुकूल रॉयसोबत सातव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली, जी संघाच्या विजयासाठी महत्वाची ठरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---