---Advertisement---

IPL 2020: आज दिल्ली-राजस्थान येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

On: बुधवार, ऑक्टोबर 14, 2020 12:02 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये बुधवारी (14 ऑक्टोबर) दुबईमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रात्री 7.30 वाजता सामना होणार आहे. दिल्लीने या हंगामात दुबईच्या मैदानावर आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि सर्व सामने जिंकले आहेत. राजस्थानने येथे दोन सामने खेळले आहेत त्यामध्ये राजस्थानने एक जिंकला तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. या दोन संघात शारजाह येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने राजस्थानला 46 धावांनी पराभूत केले होते.

दिल्लीने शारजाहमध्ये या हंगामातील सर्वात छोट्या लक्ष्याचा यशस्वीपणे केला बचाव

मागील सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने राजस्थानला 185 धावांचे लक्ष्य दिले होते. शारजाहमध्ये या हंगामातील हे सर्वात छोटी धावसंख्या होती. राजस्थानला हे लक्ष्य गाठण्यात अपयश आले होते आणि संघ 19.4 षटकांत अवघ्या 138 धावांवर सर्वबाद झाला होता.

बटलर, सॅमसनवर असेल नजर

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी अव्वल 4 फलंदाजांवर जास्त निर्भर आहे. संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, जॉस बटलर, बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन या फलंदाजांवर असेल. त्याचबरोबर गोलंदाजीत जोफ्रा आर्चरबरोबर उर्वरित गोलंदाजांनाही विकेट घ्याव्या लागतील. दिल्लीविरुद्धच्या मागील सामन्यात स्टोक्स खेळला नव्हता. मात्र, उर्वरित तीन फलंदाजांनाही अपयश आले होते.

दिल्ली संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये

दिल्लीचे फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन संघाला चांगली सुरुवात देत आहेत. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिसही आक्रमक फलंदाजी करत आहेत. त्याचबरोबर कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किए, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. मात्र दुखापतीमुळे यष्टीरक्षक रिषभ पंत संघातून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता त्याच्याऐवजी कोणाला संघात स्थान मिळेल हे पाहावे लागेल.

खेळपट्टी आणि हवामान अहवाल

दुबईतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ होईल. तापमान 23 ते 36 डिग्री सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. या आयपीएलपूर्वी खेळल्या गेलेल्या मागील 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55.74% आहे.

आयपीएलमध्ये राजस्थानचा विजय मिळवण्याचा दर आहे दिल्लीपेक्षा अधिक

आयपीएलमध्ये राजस्थानचा विजय मिळवण्याचा दर दिल्लीपेक्षा अधिक आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 184 सामने खेळले आहेत. त्यात 83 सामने जिंकले आहेत आणि 100 सामने गमावले आहेत. लीगमध्ये दिल्लीचा विजय मिळवण्याचा दर 44.78% आहे. त्याचबरोबर राजस्थानने आतापर्यंत एकूण 154 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 78 मध्ये जिंकले आणि 74 सामन्यांमध्ये हा संघ पराभूत झाला आहे. लीगमध्ये राजस्थानचा विजय मिळवण्याचा दर 50.98% आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

फिरकीने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या राशिदविरुद्ध धावा करायच्यात ना? सेहवागच्या ‘या’ टिप्स ऐका

वाह क्या बात है! धोनीचा अवघड झेल घेण्यात अपयशी ठरल्यानंतरही होतेयं संदीपचं कौतुक, पाहा व्हिडिओ

“आयपीएलमध्ये जागा आहे का?”, करीना कपूरने ‘या’ व्यक्तीसाठी केली विनंती

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार

IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत

स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---