---Advertisement---

आयपीएलमध्ये ३ शतके ठोकणाऱ्या राजस्थानच्या ‘या’ फलंदाजाचा मुंबईविरुद्ध मोठा रेकॉर्ड, पूर्ण केले ‘द्विशतक’

On: शनिवार, एप्रिल 2, 2022 4:10 PM
Sanju-Samson
---Advertisement---

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारी (०२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२२चा नववा सामना खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना रंगला होता. नाणेफेकीचा कौल मुंबई संघाच्या बाजूने लागल्यामुळे राजस्थानचे फलंदाज प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आले होते. दरम्यान राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन याने मैदानावर पाऊल ठेवताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

मुंबईविरुद्ध (MI vs RR) संजूने खास द्विशतक (Sanju Samson’s 200th T20 Match) पूर्ण केले आहे. हा त्याचा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट कारकिर्दीतील २०० वा सामना होता. यामध्ये त्याच्या १२३ आयपीएल आणि १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा समावेश आहे. 

मुंबईविरुद्धचा हा सामना संजूचा (Sanju Samson) १२३ वा आयपीएल सामना आहे. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ३०व्या क्रमांकावर आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा स्टार यष्टीरक्षक एमएस धोनी २२२ सामन्यांसह अव्वलस्थानी आहे.

संजू सॅमसनची ट्वेंटी ट्वेंटी कारकिर्द
संजूने मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी १९९ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळताना १३१ च्या स्ट्राईक रेटने ४८८९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि ३१ अर्धशतकेही केली आहेत. विशेष म्हणजे, संजूने ट्वेंटी ट्वेंटी कारकिर्दीतील तिन्हीही शतके आयपीएलमध्ये ठोकली आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून १६ अर्धशतकेही निघाली आहेत. आयपीएलमध्ये १२३ सामने खेळताना त्याने ३१२३ धावाही केल्या आहेत. याखेरीज ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात २११ षटकार आणि ३८३ चौकारही आहेत.

असे आहेत ११ जणांचे संघ (Playing XI) –
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बसिल थम्पी

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---