आयपीएल 2026 च्या 36व्या सामन्यात एक अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली. 2008चे विजेते असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना, 2016 चे विजेते असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी झाला. या दोन संघांमधील हा सामना जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळला गेला, जिथे सनरायझर्स हैदराबादने 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. जयपूरमध्ये हैदराबादच्या फलंदाजांनी अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केली.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, राजस्थान रॉयल्सने 6 गड्यांच्या बदल्यात 228 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने तुफानी फलंदाजी करत 103 धावांची शतकी खेळी साकारली. दरम्यान, ध्रुव जुरेलनेही शानदार अर्धशतक झळकावले. हैदराबादच्या बाजूने, प्रफुल्ल हिंगे आणि ईशान मलिंगा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
आरआरच्या या विशाल धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, सनरायझर्स हैदराबादने अत्यंत उत्कृष्ट फलंदाजी करत 229 धावांचे लक्ष्य केवळ 5 गडी गमावून 19व्या षटकामध्येच गाठले. सनरायझर्स हैदराबादकडून ईशान किशनने अवघ्या 31 चेंडूंमध्ये 74 धावांची स्फोटक खेळी केली. दरम्यान, अभिषेक शर्मानेही 29 चेंडूंमध्ये 57 धावांची वादळी खेळी साकारली. हा आयपीएल 2026 मधील एसआरचचा 5वा विजय ठरला आहे. परिणामी, हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेपावला असून, त्यांच्या खात्यात 10 गुण जमा झाले आहेत. याउलट, राजस्थान रॉयल्स संघ तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. हैदराबाद आणि राजस्थान या दोन्ही संघांचे गुण 10 आहेत, परंतु एसआरचचा नेट रन रेट (Net Run Rate) सरस असल्यामुळे त्यांना गुणतालिकेत वरचे स्थान मिळाले आहे.






3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर