सोमवारी (१९ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२०च्या ३७व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ७ विकेट्सने विकेट्सने नमवले. हा राजस्थानचा हंगामातील चौथा विजय होता. त्यामुळे त्यांनी ८ गुणांची कमाई करत प्ले ऑफच्या आशा पल्लवित केल्या आहेत. तर दूसऱ्या बाजूला चेन्नई हंगामातील ७ सामने गमावत प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने मर्यादित २० षटकात ५ विकेट्स गमावत केवळ १२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १५ चेंडू राखून चेन्नईचे लक्ष्य गाठले आणि हंगामातील चौथा विजय नोंदवला.
राजस्थानकडून फलंदाजी करताना जोस बटलरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५व्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद राहत ४८ चेंडूत ७० धावा केल्या. यात त्याच्या ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तसेच चेन्नईचे १२६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी कर्णधार स्टिव्ह स्मिथने २६ धावा आणि बेन स्टोक्सने १९ धावांचे योगदान दिले.
चेन्नईकडून गोलंदाजी करताना दिपक चाहरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. ४ षटकात केवळ १८ धावा देत त्याने हा कारनामा केला. तर जोश हेजलवुडनेही रॉबिन उथप्पाला तंबूत धाडलं होते. इतर गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आलं नाही.
तत्पुर्वी चेन्नईकडून प्रथम फलंदाजी करताना रविंद्र जडेजाने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर संघाच्या धावसंख्येत एमएस धोनीने २८ धावा, सॅम करनने २२ धावा जोडल्या. उर्वरित फलंदाज २० पेक्षा जास्त धावा करु शकले नाहीत. राजस्थानकडून गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि राहुल तेवतियाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो’ रांगतही नव्हता तेव्हा वाॅटसनने सुरू केलेलं क्रिकेट, आज त्यानेच केली ‘दांडी गुल’
धोनी रिव्ह्यू सिस्टिम पुन्हा ऍक्टिवेट- पाहा कशी वाचवली अंबाती रायडूची विकेट
धोनीची निती वापरली धोनीलाच! संजू सॅमसनने असा केला धोनीचा गेम
ट्रेंडिंग लेख-
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’