---Advertisement---

SAvsIND, 1st Test, Live: सेंच्युरीयन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा खेळ; एकही चेंडू न टाकता खेळ रद्द

On: सोमवार, डिसेंबर 27, 2021 6:15 PM
Centurion
---Advertisement---

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्याचा सोमवारी दुसरा दिवस आहे. मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच सेंच्यूरियनमध्ये पावसाला सुरूवात झाली.  जवळपास चार तास प्रतीक्षा करूनही वारंवार पाऊस येत असल्याने सामन्याच्या दुसऱ्याा दिवसाच खेळ रद्द करण्यात आला.

या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने पहिल्या डावात ९० षटकांमध्ये ३ बाद २७२ धावा केल्या आहेत. केएल राहुल १२२ धावांवर आणि अजिंक्य रहाणे ४० धावांवर नाबाद आहे. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने ३ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---