भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटलं की, चाहत्यांच्या भावनांचे हिंदोळे उचंबळून येतात. चाहत्यांच्या अशाच काहीशा भावना पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान संघातील सामन्यांमध्येही पाहावयास मिळतात. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) दुबई येथे हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. तत्पूर्वीच अफगानिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने चाहत्यांना दंगा न करता शांततेत हा सामना पाहण्याची विनवणी केली होती. तरीही चाहत्यांचे आपापसांत वाद झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे.
इकडे दुबईच्या मैदानावर अफगानिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि तिकडे मैदानाबाहेर दोन्ही संघातील चाहते एकमेकांशी भिडलेले पाहायला मिळाले. चाहते इतके अनियंत्रित झाले होते की, त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांना क्रूर मार्गाचा अवलंब करावा लागला.
या लाजिरवाण्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मोठ्या संख्येने चाहते आपापल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी दुबईला आले होते. यादरम्यान स्टेडियममधील जागा पूर्णपणे बुक झाल्याने बऱ्याच चाहत्यांना तिकीट मिळाले नाहीत. यावेळी अफगानिस्तानच्या काही चाहत्यांनी विनातिकीच दुबई स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने चाहते धावत आल्याने परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली. त्यामुळे त्यांना बऱ्याचशा चाहत्यांना अटक करावी लागली.
Afghan crowd is desperate to watch match many are arrested by police they were trying to enter stadium without ticket #afg #pak #PakvsAfg pic.twitter.com/d0bR78vqBA
— Qamber Zaidi (@qamberzaidii) October 29, 2021
https://twitter.com/waqyyy/status/1454108477631209481?s=20
इतकेच नव्हे तर, चाहत्यांनी केवळ स्टेडियमबाहेरच नव्हे तर स्टेडियममध्येही गोंधळा घातला. सामन्यादरम्यान अफगानिस्तान आणि पाकिस्तान संघातील २ चाहते एकमेकांशी भिडलेले पाहायला मिळाले. अगदी त्यांनी धक्काबुक्की करण्यासह एकमेकांना लाथा मारण्याची कृती केली. यावेळी स्टेडियममधील सेक्यूरिटी गार्डला धाव घेत त्यांचे भांडण मिटवावे लागले.
https://twitter.com/joshthebutter/status/1454097316483194890?s=20
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, पाकिस्तानच्या खेळाडूंच्या पुढे अफगानिस्तानच्या संघाने गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अफगानिस्तानला १४७ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात कर्णधार बाबर आझमने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पुढे मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या आसिफ अलीने चौफेर फटकेबाजी करत १९ व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला आहे. यासह पाकिस्तानने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान जवळपास निश्चित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जावया’ला चीयर करण्यासाठी दुबईत पोहोचला शाहीद आफ्रिदी, मुलींनाही नेलं सोबत; फोटो व्हायरल
बाबर आझमची विराट कोहलीला टक्कर! आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ‘या’ विक्रमाच्या यादीत साधली बरोबरी