भारतात देशांतर्गत क्रिकेटमधील रनमशीन अशी ओळख असणाऱ्या वसीम जाफरने आज इराणी कप स्पर्धेत शतकी खेळी केली.
इराणी ट्राॅफीचा थरार नागपूर येथील जामठावरील विदर्भ क्रिकेट असोशियशनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात विदर्भाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
या निर्णय योग्य ठरवत विदर्भाने शेष भारताविरूद्ध २ बाद २७९ अशी चांगली सुरूवात केली आहे.
त्यात मुंबईकर वसीम जाफरने आज विदर्भाकडून खेळताना १५७चेंडूत ११० धावांची नाबाद खेळी केली आहे.
त्याची हा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५३वी शतकी खेळी ठरली आहे. त्याने आजपर्यंत १२ इराणी ट्राॅफी सामन्यात ५३.०५च्या सरासरीने ३ शतकांसह ११०९ धावा केल्या आहेत.
तो इराणी ट्राॅफी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच इराणी ट्राॅफीमध्ये सलग ६ डावात ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो आज केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.
Run machine Wasim Jaffer celebrates his 53rd First-class century in @paytm #IraniCup #ROIvVID pic.twitter.com/CGFB8ApcVm
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2018