IND vs ENG 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना हैद्राबाद इथे सुरु आहे. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिलाच सामना आहे. इंग्लंडने इथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला परंतू हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. याशिवाय पहिल्याच दिवशी क्रिकेटमध्ये कधीही पाहायला न मिळणारी गोष्ट पाहायला मिळाली.
इंग्लिश क्रिकेटर रेहान अहमद फलंदाजी करत असताना हा किस्सा घडला. जसप्रीत बुमराहने रेहानला फुलटॉस चेंडू टाकला. रेहानने हा चेंडू फ्लिक केला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी २ धावा घेतल्या. जेव्हा क्षेत्ररक्षकाने चेंडू टाकला तेव्हा तो बॅकअप फिल्डरला कलेक्ट करता आला नाही व चेंडू थेट सीमापार गेला. यामुळे फलंदाजांना एकूण ६ धावा मिळाल्या.
परंतू यानंतर पंचांनी आपला निर्णय मागे घेतला व ५ धावाच इंग्लंड संघाला दिल्या. यासाठी पंचांनी आयसीसीचा नियम वापरला. आयसीसीचा नियम असा सांगतो की जेव्हा क्षेत्ररक्षकाने चेंडू टाकला आहे, त्यापुर्वी दोनही फलंदाजांनी एकमेकांना धाव घेताना क्रॉस केलेले असायला हवे. परंतू असे इथे घडले नव्हते. त्यामुळे ज्या दोन धावा फलंदाजांनी पळून काढल्या, त्यातील एकच धावा त्यांना देण्यात आली तर चौकारच्या ४ अशा मिळून ५ धावा इंग्लंडला मिळाल्या.
२०१९मध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात देखील असाच वाज झाला होता. पहिल्यांदा इंग्लंडला ६ धावा देण्यात आल्या होत्या परंतू त्या नंतर ५ करण्यात आल्या होत्या.
नियम काय सांगतो?
जर क्षेत्ररक्षकाने केलेल्या ओव्हरथ्रोमुळे जर चौकार गेला असेल तर फलंदाजांनी थ्रो करण्यापुर्वी जेवढ्या वेळा एकमेकांना क्रॉस केले आहेत तेवढ्याच धावा पळून काढलेल्या मोजल्या जातात. तसेच त्यात चौकारच्या धावा मोजल्या जातात. परंतू थ्रो करण्यापुर्वी त्यांनी एकमेकांना क्रॉस केलेले नसेल तर ती धाव मोजली जात नाही. (Runs scored 6, conceded 5 a strange incident happened in the IND-ENG Test)
हेही वाचा
नाद खुळा! जगातील सर्वोत्तम क्रिकेटर रुटला २ भारतीयांनी केलंय नको-नको
IND vs ENG: टीम इंडियातून आवेश खानला का बाहेर काढण्यात आलं? वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण