शनिवारी (३ ऑक्टोबर) भारतीय हॉकी संघाचा अनुभवी डिफेंडर रुपिंदर पाल सिंग याने महत्त्वाची माहिती दिली आहे. हॉकी इंडियाने राष्ट्रीय हॉकी संघासाठी केंद्रीकृत प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित केला असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच खूप कमी असे आंतरराष्ट्रीय संघ आहेत, जिथे सहकारी कर्मचारी आणि संघातील खेळाडू एकाच वातावरणात राहतात, असेही तो पुढे बोलताना म्हणाला आहे.
खरं तर गेल्या काही वर्षांपासून रुपिंदर या केंद्रीकृत प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहे. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनात बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. या केंद्रीकृत प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी बोलताना रुपिंदर म्हणाला की, “आपण जगातील अशा निवडक संघांपैकी एक आहोत, ज्यांच्याद्वारे केंद्रिकृत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि यात सर्व गटातील सर्व खेळाडू एकत्र राहतात, एकत्र सराव करतात आणि पूर्ण वर्षभर प्रतिस्पर्धी सामने खेळतात.”
२०१० साली भारतीय हॉकी संघात पदार्पण करणारा रुपिंदर शेवटी बोलताना म्हणाला की, “या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे सलग हॉकी खेळण्याची शैली विकसित होण्यास मदत होते.”
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून मी समदला गोलंदाजी दिली”, शेवटचे षटक फिरकीपटूला दिल्याबद्दल डेविड वॉर्नरचे स्पष्टीकरण
शून्यावर बाद… विषयच सोडा! एकदाही डक विकेट न होता १००पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे धुरंदर
ट्रेंडिंग लेख-
अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी
आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये गोलंदाजांना धू धू धुणारे टॉप-१० फलंदाज, केल्यात सर्वाधिक धावा
यशस्वी जयस्वाल आणि धोनीच्या फोटोने घातलाय युपीतील ‘या’ जिल्ह्यात धुमाकूळ, वाचा काय आहे नक्की स्टोरी