---Advertisement---

MPL 2025:ऋषभ राठोडची कॅप्टन्स इनिंग, रायगड रॉयल्सच्याही स्कोरबोर्डवर 190 धावा

On: गुरूवार, जून 5, 2025 4:18 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा हंगामातील दुसरा सामना खेळला गेला. रायगड रॉयल्स व सातारा वॉरियर्स यांच्यातील या सामन्यात रायगड ‌संघाने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा उभ्या केल्या. रायगडचा कर्णधार ऋषभ राठोड याने आक्रमक अर्धशतक झळकावले.

हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात साताऱ्याचा कर्णधार सौरभ नवले याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय वैभव दरकुंडे व राजवर्धन हंगरगेकर यांनी योग्य ठरवला. दोघांनी पहिल्या पाच षटकातच 42 धावांवर रायगडचे चार फलंदाज तंबूत पाठवले. त्यानंतर कर्णधार ऋषभ राठोड व ऋग्वेद मोरे ही जोडी जमली. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 130 धावांची मोठी भागीदारी रचली.

अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळण्याच्या नादात ऋग्वेद बाद झाला. त्याने 41 चेंडूंमध्ये तीन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. ऋषभ याने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी 45 चेंडूंवर 6 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. अजय बोरुडे याने आक्रमक 16 धावा करत संघाला 190 पर्यंत मजल मारून दिली. सातारा संघासाठी वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर वैभव दरकुंडे याने दोन फलंदाज बाद केले.

हंगामातील आपला पहिला सामना खेळताना रायगड रॉयल्सने हर्ष मोगावीरा, दिग्विजय पाटील, सागर जाधव व हितेश वाळुंज यांना पदार्पणाची संधी दिली. तर, दुसऱ्या बाजूला सातारा संघ स्पर्धेत प्रथमच उतरत आहे. छत्रपती संभाजी किंग्स संघाने एमपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने, सातारा वॉरियर्सला ही संधी मिळाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---