---Advertisement---

बाबा जरा जपून! आंद्रे रसलच्या जोरदार शॉटवर दुखापग्रस्त होता होता थोडक्यात बचावला दिनेश कार्तिक, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

भारतात सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची जोरदार चर्चा रंगली आहे. या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या हंगामासाठी सर्व संघांची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे. मात्र, असाच सराव करत असताना शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दुखापत होता होता थोडक्यात बचावला आहे.

झाले असे की कोलकाता नाईट रायजर्ड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसल डीवाय पाटील स्टेडियमवर सराव सामन्यात फलंदाजी करत होता. यावेळी नॉन-स्ट्रायकर एन्डला दिनेश कार्तिक उभा होता. त्यावेळी रसलने एक शॉट इतका जोरदार मारला की त्यावर कार्तिकला दुखापतही होऊ शकली असती. मात्र, कार्तिकने चपळता दाखवत बाजूला उडी घेतली. ज्यामुळे तो चेंडू लागण्यापासून थोडक्यात बचावला.

या सामन्याचा व्हिडिओ कोलकाता संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आयपीएल २०२१ मधील केकेआरचा पहिला सामना ११ एप्रिलला

आयपीएल २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. केकेआर आयपीएल २०२१ हंगामात त्यांचे पहिले ३ साखळी फेरीचे सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे. त्यानंतरचे साखळी फेरीतील २ सामने मुंबईमध्ये होतील, तर त्यानंतर केकेआरचे अहमदाबादला ४ आणि बेंगलोरला ५ साखळी फेरीतील सामने होणार आहेत. केकेआरचा पहिला सामना ११ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

आयपीएल २०२१ साठी कोलकाता नाईट रायडर्स संघ –

दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, गुरकिरत सिंग मन, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारायण, इयॉन मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टीम सिफर्ट, शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, वेंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलमध्ये खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास कसे करणार पुनरागमन? जाणून घ्या नियम

अरर! क्विंटॉन डीकॉकच्या चालाखीमुळे फखर जमानचे दुसरे वनडे द्विशतक थोडक्यात हुकले, पाहा व्हिडिओ

आरसीबीच्या आव्हानासाठी मुंबईचे शिलेदार सज्ज, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरतील गतविजेते

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---