---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास कसे करणार पुनरागमन? जाणून घ्या नियम

On: रविवार, एप्रिल 4, 2021 11:50 PM
ipl-corona
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे युएई मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र यंदा पुन्हा एकदा भारतात ही स्पर्धा परतली आहे.
परंतु तरीही या स्पर्धेवरचा कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नाहिये. स्पर्धेआधी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वारंवार आढळत आहे. अशावेळी सगळ्यांनाच प्रश्न पडतो आहे की जर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्यांना स्पर्धेत पुनरागमन करता येणार की नाही. चला तर मग जाणून घेऊया याबाबतचे नियम काय आहेत.

गेल्या काही दिवसांत आयपीएल मधील नितीश राणा, अक्षर पटेल, देवदत्त पड्डीकल हे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील नितीश राणा बरा झाल्याने तो संघात परतला आहे. मात्र अक्षर पटेल आणि देवदत्त पड्डीकल हे अजून बरे झाले नसल्याने ते बायो बबलमधून बाहेर होऊन क्वारंटाईन झाले आहेत. त्यांना पुनरागमन करण्यासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत.

बीसीसीआयच्या नियमांनुसार जर एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या खेळाडूला बायो बबल बाहेर १० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल. त्यानंतर ९-१० दिवसांनी त्या खेळाडूची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येईल. जर या दरम्यान तो खेळाडू पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला पुन्हा १० दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागेल. आणि जर ते कोरोना निगेटिव्ह असल्यास त्याला बायो बबलमध्ये परत येण्याची परवानगी दिली जाते.

क्वारंटाईन कालावधी दरम्यान संपूर्ण विश्रांति घेणे, या खेळाडूंना अनिवार्य आहे. तसेच कुठल्याही प्रकारच्या शारीरिक व्यायाम करण्याची परवानगी नाही. तसेच या कालावधी दरम्यान खेळाडूच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास त्याला ताबडतोब दवाखान्यात दाखल केले जाणार आहे.

दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियम मधील १० देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय आयपीएलचे सामने हैद्राबाद अथवा इंदोर येथे हलवण्याची देखील शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

अरर! क्विंटॉन डीकॉकच्या चालाखीमुळे फखर जमानचे दुसरे वनडे द्विशतक थोडक्यात हुकले, पाहा व्हिडिओ

जिंकलस भावा! विराट कोहलीच्या सामाजिक कार्यात आणखी एक भर, पशू-पक्ष्यांच्या मदतीसाठी आला धावून

टेबल टेनिसमध्येही पुजाराच्या डिफेन्सने फोडला दीपक चहरला घाम, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---