---Advertisement---

टेबल टेनिसमध्येही पुजाराच्या डिफेन्सने फोडला दीपक चहरला घाम, पाहा व्हिडिओ

On: रविवार, एप्रिल 4, 2021 9:14 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ फलंदाज चेतेश्वर पुजारा दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा आयपीएल मध्ये पुनरागमन करणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्याला ५० लाख रुपयांच्या मूळ किमतीला खरेदी केले. त्यामुळे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली यंदा पुजारा आपली टी२० क्रिकेटमधील उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहे.

यासाठी त्याने संघासह कसून सराव देखील सुरू केला आहे. काहीच दिवसांपूर्वी नेटमध्ये मोठे मोठे फटके मारतांना पण दिसून आला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार चर्चेत देखील होता. आता पुजाराचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

दीपक चहरसह खेळला टेबल टेनिस
चेन्नई सुपर किंग्जचा २८ वर्षीय गोलंदाज दीपक चहरसह पुजारा टेबल टेनिस खेळत असल्याचे या व्हिडिओत दिसतो आहे. दीपक चहरनेच हा व्हिडिओ आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. गंमत म्हणजे या व्हिडिओत पुजारा आणि दीपक क्रिकेटच्या बॅटने टेबल टेनिस खेळत आहेत.

पुजाराच्या हातात टेबल टेनिसचीच रॅकेट असल्याचे दिसून येत आहे. मात्र दीपक चहर क्रिकेटच्या बॅटने यात टेबल टेनिस खेळतांना दिसून येतो आहे. विशेष म्हणजे यात पॉईंट देखील अखेरीस पुजाराच जिंकतो आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ शेअर करतांना दीपक चहरने “वा भैय्या. तुमचा डिफेन्स इथे देखिल अतिशय मजबूत आहे. मी क्रिकेटच्या बॅटने खेळून देखील एकही पॉईंट मिळवू शकलो नाही”, असे मजेदार कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/p/CNJrWkCn0yp/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी आयपीएलचा मागील हंगाम निराशाजनक ठरला होता. त्यांना बाद फेरी गाठण्यात देखील अपयश आले होते. त्यामुळे यंदा दीपक चहर, चेतेश्वर पुजारा यासह इतरही सगळेच खेळाडू मागील हंगाम विसरून यंदा दमदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील. चेन्नईचा संघ आपल्या आयपीएल अभियानाची सुरुवात १० मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्याद्वारे करेल.

महत्वाच्या बातम्या:

जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू करतात चार्ली चॅप्लिनची नक्कल, पाहा धमाल व्हिडिओ

मोईन अलीच्या मागणीला आले यश! चेन्नईने त्याच्यासाठी खास जर्सीत केला हा बदल

सीेएसकेच्या चिंतेत वाढ! जोश हेजलवूडची माघार, ‘या’ दोन गोलंदाजांनी दिला खेळण्यास नकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---