---Advertisement---

…जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू करतात चार्ली चॅप्लिनची नक्कल, पाहा धमाल व्हिडिओ

On: रविवार, एप्रिल 4, 2021 8:26 PM
---Advertisement---

आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. जशी जशी ही तारीख जवळ येते आहे, तशी चाहते आणि खेळाडूंची उत्सुकता देखील आता शिगेला पोहोचली आहे. सगळेच भारतीय तसेच परदेशी खेळाडू आपापल्या संघाच्या ताफ्यात दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवात देखील केली आहे.

हे खेळाडू मैदानावर तर कसून सराव करतच आहेत. मात्र त्यासह ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांसह खूप सारी मस्ती करतांना देखील दिसून येत आहेत. खेळाडूंच्या अशाच एका मस्तीचा व्हिडिओ आता समोर आला आहे, ज्याला चाहत्यांची देखील मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंची धमाल
दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू असलेल्या आर अश्विन, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांच्या मस्तीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. आर अश्विननेच हा व्हिडिओ आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत हे तीनही क्रिकेटर प्रसिद्ध विनोदवीर चार्ली चॅप्लिन यांची नक्कल करत असल्याचे दिसून येत आहे. अश्विनने या व्हिडिओला ‘जेव्हा आम्ही चार्ली चॅप्लिन बनण्याचा प्रयत्न करतो’, असे कॅप्शन देखील दिले आहे. हा व्हिडिओ अश्विनने शेअर करताच अनेक चाहत्यांनी त्याला पसंती दर्शवली आहे.

https://www.instagram.com/p/CNPH9YFnfLr/?utm_source=ig_web_copy_link

राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्याने अभियानाला सुरुवात
गत आयपीएलचे उपविजेते असलेले दिल्ली कॅपिटल्स यंदाच्या हंगामाची सुरुवात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्याने करतील. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजेपासून हा सामना खेळवला जाईल. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळवला जाईल. मागील हंगामात विजेतेपदापासून अवघ्या एका पावलाने दूर राहिलेल्या दिल्लीचा यंदा ते जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असेल.

महत्वाच्या बातम्या:

मोईन अलीच्या मागणीला आले यश! चेन्नईने त्याच्यासाठी खास जर्सीत केला हा बदल

सीेएसकेच्या चिंतेत वाढ! जोश हेजलवूडची माघार, ‘या’ दोन गोलंदाजांनी दिला खेळण्यास नकार

व्हिडिओ : खतरनाक! पाकिस्तानी गोलंदाजाच्या चेंडूने टेंबा बवुमाच्या बॅटचे झाले चक्क दोन तुकडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---