मॉस्को। फिफा विश्वचषकातील उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी रशियाचा डिफेंडर इल्या कुटेपोह याने जखमी असताना सुद्धा सामना पूर्ण वेळ खेळला.
क्रोएशिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पेनाल्टी शूट-आऊटचा 20 मिनीटांचा खेळ कुटेपोहने खेळला. या सामन्यात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
यजमान रशियाने बाद फेरीत स्पेनला पेनाल्टीमध्ये पराभूत करून उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश केला. मात्र त्यांना या सामन्यात क्रोएशिया विरुद्ध खेळताना 2-2 असे बरोबरीत असताना पेनाल्टीमध्ये 4-3 पिछाडीवर पडले.
कुटेपोहला ही जखम पहिल्या सत्रातच झाली होती. तरीही तो पुढचे 100 मिनीटे खेळला.
रशिया फुटबॉल संघाने कुटेपोहच्या पायाचा फोटो ट्विटरवर शेयर केला. यामधून दिसून येते की त्याची ही दुखापत किती मोठी आहे.
Нога Ильи Кутепова – лишнее подтверждение тому, что команда делала все что могла и даже больше!
Травма была получена в первом тайме, а впереди было ещё 100 минут…#ВместеМыКоманда pic.twitter.com/CRwE1eIxav— Сборная России (@TeamRussia) July 8, 2018
या ट्विटमध्ये त्यांनी असे लिहले आहे की, “रशियाचा संघ कसा खेळला हे कुटेपोहच्या पायावरूनच दिसते. पहिल्या सत्राचा खेळ संपतानाच त्याला ही दुखापत झाली तरीही तो पुढची 100 मिनीटे खेळला.”
उपांत्यपूर्व सामन्यात रशियाच्या संघाने चांगला खेळला होता. उपांत्य सामन्यात जर ते पोहचले असते तर तो त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला असता.
यजमान संघाने या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सौदी अरबला 5-0ने हरवत विजयी सुरूवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक: उपांत्य फेरीत आज क्रोएशिया लढणार इंग्लंडशी
–रोनाल्डोचा रियल मॅद्रिदला अखेर रामराम, फुटबाॅल विश्वात २१ व्या शतकातील सर्वात मोठी ट्रांस्फर
–फिफा विश्वचषक: बेल्जियमचा पराभव करत फ्रान्सने तिसऱ्यांदा गाठली अंतिम फेरी