मॉस्को। नुकताच रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. यामुळे या दरम्यान रशियातील व्यवस्थापनेवर आणि आयटी विभागावरील जवळ-जवळ 25 मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकारला यश आले.
“फिफा विश्वचषक ही फुटबॉलची मोठी स्पर्धा आहे. त्याचाच फायदा घेऊन रशियाची व्यवस्था हॅक करणे आणि सायबर हल्ले करण्यात सोपे जाईल, असे वाटत असले तरी आम्ही ते योग्य रितीने रोखले”, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले.
“ही स्पर्धा सुरू असताना आम्हांला सायबर हल्ले आणि आयटी विभागाविरुद्ध इतर गुन्हेगारी हालचाली होत असल्याचा सुगावा मिळाला”, असे त्यांनी पुढे सांगितले.
या विश्वचषकातील सुरक्षा व्यवस्थेचे आभार मानण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
एक महिनाभर चालेल्या स्पर्धेत 55 विशेष सेवा पुरवणाऱ्या पथकाचे आणि 34 देशांच्या मदतीने कायदा अंमलबजावणी एजेन्सीचे त्यांनी आभार मानले.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच तेथील सुरक्षा व्यवस्थेने 2 मिलीयन पेक्षा जास्त लोकांची तपासणी केली. रविवारी (15जुलै) झालेल्या अंतिम सामन्यानंतर पुतिन यांनी चाहत्यांचेही आभार मानले.
चाहत्यांचे फुटबॉलवरील प्रेम बघून त्यांनी या चाहत्यांसाठी व्हीसा मोफत दिला आहे. हा व्हीसा या वर्षाअखेर पर्यंत उपलब्ध असणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक २०१८: अंतिम सामन्यातील कृत्य रशियन तरुणीला पडले महागात
–लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंड फुटबॉल संघाच्या मॅनेजरचे नाव