नवी मुंबई, 23 डिसेंबर, 2023: नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली आणि गणेश नाईक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत रशियाच्या जागतिक क्रमवारीत 188व्या स्थानी असलेल्या एकतेरिना मकारोवाला अव्वल मानांकन, तर जपानच्या जागतिक क्र. 196 असलेल्या मोयूका उचीजिमाला दुसरे मानांकन देण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक डॉ.दिलीप के राणे यांनी सांगितले की, स्पर्धेत एकुण 40,000 डॉलर(33,29,804रुपये)रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यात आयटीएफ स्पर्धेतील ही सलग तिसरी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून याआधी मुंबई आणि सोलापूर या ठिकाणी दोन आयटीएफ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. विशेष म्हणजे 40000रकमेची यावर्षातील हि पहिलीच आयटीएफ स्पर्धा होत आहे. स्पर्धेत 18 देशांतील अव्वल महिला टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र गटातील सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले, सहजा यमलापल्ली, वैदेही चौधरी, झील देसाई आणि श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती या भारतीय महिला खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
गुणवान उदयोन्मुख खेळाडू पुण्याची वैष्णवी आडकर, नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे याना एमएसएलटीएच्या वतीने मुख्य ड्रॉमध्ये वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला असून स्मृती भसीन आणि सुतीर्था मरुरी यांना एआयटीएच्या वतीने वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, माजी जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकाची खेळाडू फ्रान्सची क्रिस्टिना मालदेनोव्हिक या स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे गेली दहा वर्षे सलग आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा खोवला गेला आहे. आजवर एकाही भारतीय खेळाडूला हि स्पर्धा जिंकता आली नाही. तसेच, यंदाच्या आयटीएफ मौसमातील हि अखेरची स्पर्धा असून नव वर्षाच्या सुरुवातील आपल्या मानांकनात सुधारणा करण्यासाठी खेळाडूंना या स्पर्धेतील गुणांचा निश्चितच उपयोग होईल. भारतीय खेळाडू या स्पर्धेचा पुरेपूर फायदा करून घेतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.
स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला 70 डब्लूटीए गुण व 6,094डॉलर(2,45,000/-रुपये) , उपविजेत्या खेळाडूला 42डब्लूटीए गुण व 3,257डॉलर(1,30,600/- रुपये), उपांत्यफेरीतील खेळाडूस 25 गुण व 1789डॉलर, उपांत्यपूर्वफेरीतील खेळाडूस 13 गुण व 1029 डॉलर आणि उप-उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूस 7 गुण व 624 डॉलर देण्यात येणार आहे. मुख्य ड्रॉमधील पहिल्या फेरीतील पात्र खेळाडूस 1 गुण व 370 डॉलर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
याशिवाय दुसऱ्या पात्रता फेरीतील खेळाडूस 24 गुण व 95 डॉलर , तिसऱ्या फेरीतील पात्र खेळाडूस 2 गुण व 153डॉलर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील दुहेरीत विजेत्या जोडीला 2230डॉलर आणि उपविजेत्या जोडीला 1115 डॉलर, उपांत्य फेरीतील जोडीस 557डॉलर, उपांत्यपूर्वफेरीतील जोडीस 304डॉलर आणि पहिल्या फेरीतील जोडीस 203 डॉलर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इराणच्या हसन समानी यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. (Russia’s Ekaterina Makarova tops in $40,000 Ganesh Naik ITF Women’s Tennis Tournament)
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
एकेरी गट: 1. एकतेरिना मकारोवा(रशिया,188), 2.मोयुका उचिजिमा(जपान,196), 3. क्रिस्टीना मालदेनोविक(फ्रांस,226), 4.जस्टीना मिकूलस्किटी(लिथुआनिया,259), 5.सॅपफो साकेल्लारिडी(ग्रीस,282), 6.ऋतुजा भोसले(भारत,328), 7. डायना मार्सिचेविका(लात्विया,343), 8. सहजा यमलापल्ली (भारत,408);
दुहेरी: 1. डायना मार्सिचेविका(लात्विया)/ सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस), 2. एकतेरिना मकलकोवा/ एकतेरिना याशीना, 3.श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती/वैदेही चौधरी (भारत), 4.हिरोमी आबे/साकी इमामुरा(जपान).
महत्वाच्या बातम्या –
22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत साई एफसी, दुर्गा एफसी संघांची विजयी सलामी
IPL । 2015 नंतर सात आयपीएल हंगाम नाही खेळला मिचेल स्टार्क गोलंदाज, आता स्वतःच सांगितले कारण