---Advertisement---

ऋतु आणि फाफने केले आयपीएल २०२१ वर ‘राज’; विराट-एबीशी केली बरोबरी

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 1:01 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना दसऱ्याच्या मूहुर्तावर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करत चेन्नईने चौथ्या वेळी आयपीएल चषकावर नाव कोरले. चेन्नईला हे विजेतेपद मिळवून देण्यात सलामीवीर फाफ डू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी सिंहाचा वाटा उचलला.

फाफ व ऋतुराजचा नवा विक्रम
संपूर्ण आयपीएल हंगामात चेन्नईसाठी सलामीवीर फाफ डू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी जबरदस्त कामगिरी केली. अंतिम सामन्यातही त्यांनी चेन्नईला शानदार सुरुवात देत ६१ धावा जोडल्या. या दोघांनीही हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा काढून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

या हंगामात ऋतुराज गायकवाडने १६ सामने खेळताना ६३५ धावा केल्या. त्यामध्ये चार अर्धशतके व एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे, प्लेसिसने त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याला साथ दिली. प्लेसिसनेही या संपूर्ण हंगामात १६ सामने खेळत ६३३ धावा जमविल्या. यासह ही जोडी आयपीएलच्या इतिहासात एकच संघातील दोन खेळाडूंनी एका हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा काढणारी तिसरी जोडी बनली.

यापूर्वी आयपीएलमध्ये एकाच हंगामात अशी कामगिरी २०१३ मध्ये ख्रिस गेल व विराट कोहली यांनी रॉयल चॅलेंजेस बेंगलोरसाठी अनुक्रमे ७०८ व ६३४ धावा काढलेल्या. त्यानंतर २०१६ आयपीएलमध्येही विराट कोहली याने ९७३ व एबी डिव्हिलियर्सने ६८७ धावा काढल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

स्वप्नभंग! आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात पराभवाला समोरे जावे लागलेले आजपर्यंतचे संघ

नादच खुळा! ४ वेळा विजयी, ९ वेळा उपविजयी, ‘अशी’ आहे आयपीएल इतिहासातील सीएसकेची कामगिरी

चेन्नईने जिंकले चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद! पाहा आजपर्यंतचे विजेते संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---