इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी (२ ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु राजस्थानच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी करून राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकून दिला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने तुफानी शतकी खेळी केली.
या खेळीने चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. हे धडाकेबाज शतक झळकावल्यानंतर त्याने असे काही कृत्य केले, ज्यामुळे चाहत्यांना गोल्डन बॉय नीरज चोप्राची आठवण आली.
नाणेफेक गमावून फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने चांगली सुरुवात केली होती. फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळायला सुरुवात केली होती. मात्र फाफ डू प्लेसिस मोठी खेळी करू शकला नाही. तो लवकर बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने कुठलाही दबाव येऊ दिला नाही. त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत चौफेर फटकेबाजी सुरू ठेवली होती. त्याने या डावात ६० चेंडुंमध्ये ९ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली आहे.
पहिल्या डावातील शेवटच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला शतक पूर्ण करण्यासाठी ५ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी त्याने शेवटचा चेंडू हवेत मारताच सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. तो चेंडू बॅटला लागताच त्याला जाणीव झाली होती की, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे त्याने चेंडूकडे पाहिले सुद्धा नाही आणि सेलिब्रेशन करायला सुरुवात केली.
🎥 That moment when @Ruutu1331 completed his maiden #VIVOIPL 💯! 💛 💛
TAKE. A. BOW! 🙌#VIVOIPL | #RRvCSK | @ChennaiIPL
Scorecard 👉 https://t.co/jo6AKQBhuK pic.twitter.com/nRS830RvK8
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021
हे हटके सेलिब्रेशन पाहून चाहत्यांना गोल्डन बॉय नीरज चोप्राची आठवण आली. कारण नीरज चोप्राने देखील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वात लांब भाला फेकताच त्याने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याच थ्रोने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
#RuturajGaikwad #Ruturaj pic.twitter.com/HW21Y02Duf
— Shubham Sharma (@Shubham73106588) October 2, 2021
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर ४ बाद १८९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने तुफानी खेळी करत ५० धावांची खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने येऊन नाबाद ६४ धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
विषय आहे का! आतापर्यंत आयपीएल २०२१मध्ये ४ फलंदाजांनी ठोकलंय शतक, त्यातील तिघे आहेत भारतीय
दे घुमा के… आणि चेंडू स्टेडियमबाहेर! ऋतुराजसह ‘यांनी’ ठोकलेत आयपीएल २०२१मध्ये लांबच लांबच षटकार
पावरप्लेमध्ये जयस्वालचा झंझावात, ताबडतोब अर्धशतक ठोकत रैना-राहुलसारखी कामगिरी करण्यात ‘यशस्वी’