पुणे। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत ऋतुराज गायकवाड (64 धावा) व पवन शहा (57 धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुणेरी बाप्पा संघाने कोल्हापूर टस्कर्स संघावर 8 गडी राखून शानदार सुरुवात केली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात महाराष्ट्र रणजी पटू अंकित बावणेच्या 57 चेंडूत 72 धावांच्या झाजंवती खेळीच्या जोरावर सलामीच्या लढतीत कोल्हापूर टस्कर्स संघाला पुणेरी बाप्पा संघासमोर विजयासाठी 20 षटकात 7 बाद 145 धावांचे आव्हान ठेवता आले.
स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रचंड संख्येने स्टेडियम वर जमलेल्या क्रिकेट शौकिनानी आजचा दिवस गाजवला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाणेफेक केली. पुण्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलाडणाजी स्वीकारली.
केदार जाधव (22 चेंडूत 25 धावा, 3 चौकार, 1 षटकार) आणि अंकित बावणे यांनी कोल्हापूर संघाला वेगवान सलामी दिली. रोहन दामले याने केदार जाधवला बाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर मैदानात उतरलेला एमपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू नौशाद शेख केवळ 24 चेंडूत 20 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कोल्हापूरचा डाव 2 बाद 119 वरून अखेर 7 बाद 144 घसरला.
पुणेरी बाप्पा कडून पियूष चावला(3-18) आणि सचिन भोसले(3-40) यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
याच्या उत्तरात पुणेरी बाप्पा संघाने 14.1 षटकात 2बाद 145धावा करुन पुर्ण केले. यात ऋतुराज गायकवाडने 27 चेंडूत 5 चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 64 धावांची धडाकेबज खेळी केली. त्याला पवन शहाने 48 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 57 धावांची संयमी खेळी करुन साथ दिली. या सलामीच्या जोडीने 61 चेंडूत 110 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यांनतर ऋतुराज गायकवाड श्रेयस चव्हाणच्या गोलंदाजीवर अंकित बावणेने झेल पकडला. यानंतर पवन शहाने सुरज शिंदे (नाबाद 17)च्या साथीत 24 चेंडूत 32 धावांची भागीदारी करून संघाला (142 धावा)विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्यानंतर यश क्षीरसागरने नाबाद 2 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी ऋतुराज गायकवाड ठरला. (Ruturaj Gaikwad dazzles in Pune’s easy victory)
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
कोल्हापूर टस्कर्स- 20 षटकात 7 बाद 144 धाव
(अंकित बावणे 72, केदार जाधव 25; पीयुष साळवी 3-18, सचिन भोसले 3-40)
पराभुत वि. पुणेरी बाप्पा- 14.1 षटकात 2 बाद 145 धावा
(ऋतुराज गायकवाड 64, पवन शहा 57; तरनजीतसिंग धिलोन 1-13)
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! लग्नानंतर चांगलाच चमकला ऋतुराज, पत्नीचा जर्सी नंबर घालून ठोकलं झंझावाती अर्धशतक
महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रत्नागिरी जेट्सची सुरेख सुरुवात, सोलापूर टायटन्सला चारली पराभवाची धूळ





