टीम इंडियातून बाहेर असलेला सलामीवीर ऋतुराज गायकवाड इराणी कपमध्ये फ्लॉप ठरला आहे. ऋतुराज गायकवाडची बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड झाली नाही. अशा स्थितीत इराणी कप मध्ये जास्तीत जास्त धावा करून तो निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर देईल. अशी त्याच्याकडून अपेक्षा होती. मात्र गायकवाड हे करू शकला नाही. पहिल्या डावात तो स्वस्तात बाद झाला.
इराणी चषकाचा सामना मुंबई आणि रेस्ट इंडिया यांच्यात लखनऊमध्ये खेळला जात आहे. ज्यामध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 537 धावा केल्या. ज्यात सरफराज खानने जबरदस्त द्विशतक झळकावले. सर्फराजने 286 चेंडूंत 25 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 222 धावांची खेळी केली. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही 97 धावांची शानदार खेळी केली. तर गोलंदाजीत रेस्ट इंडियाकडून मुकेश कुमारने चमकदार कामगिरी करत 5 बळी घेतले.
Maiden First-Class wicket for Mohammad Juned Khan on debut 🙌
What a way to get off the mark! He gets the big wicket of captain Ruturaj Gaikwad 👌#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/KvUOFHK6Nx
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 3, 2024
प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या रेस्ट ऑफ इंडियाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र पहिल्या डावात त्याला कोणतीही असरदार कामगिरी करता आली नाही. गायकवाडने 27 चेंडूंचा सामना केला आणि त्याला केवळ 1 चौकारासह 9 धावा करता आल्या. जुनेद खानने त्याला आउटगोइंग बॉलवर स्लिपमध्ये पृथ्वी शॉकडे झेलबाद केले. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर गायकवाड पुन्हा संघर्ष करताना पाहायला मिळाला. या कारणामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. जुनैद खानचा हा पहिलाच सामना असून पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ऋतुराज गायकवाडसारख्या मोठ्या फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
ऋतुराज गायकवाडने भारतासाठी आतापर्यंत 6 वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. गायकवाडने एकदिवसीय सामन्यांमध्ये 115 धावा केल्या आहेत. तर टी20 मध्येही त्याला केवळ 633 धावा करता आल्या आहेत. तो भारतासाठी शेवटचा सामना हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना दिसला होता. आगामी बांग्लादेश मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही.
हेही वाचा-
Irani cup; सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
‘पुन्हा दुखापती’ झाल्याच्या अफवांवर मोहम्मद शमीचा खुलासा, म्हणाला, “खोट्या….”
पाकिस्तानी खेळाडूंना चार महिन्यांपासून पगार नाही, केंद्रीय करार गमावण्याचाही धोका!