आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाची कामगिरी खास राहिली नाही. पण असे असले तरी या हंगामात चेन्नईकडून काही युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचाही समावेश आहे. त्याने चेन्नईकडून शेवटच्या तीन सामन्यात अर्धशतके झळकावली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. त्यामुळे सध्या त्याचे कौतुक होत आहे. त्याचे नुकताच पुण्यात परत आल्यानंतर सत्कार करण्यात आला आहे.
चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपल्याने चेन्नईतील खेळाडू भारतात परतले आहेत. ऋतुराजही पिंपरी चिंचवडमधील जुनी सांगवी येथे त्याच्या घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर त्याचे राहत्याघरी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी बारणे यांच्यासह विश्वजीत बारणे, विजय साने, राजू कोतवाल, शिकंदर पोंगडे, चेतन शिंदे, हे देखील उपस्थित होते. याबद्दल बारणे यांच्या ट्विटरवरुन माहिती देण्यात आली आहे.
चेन्नई सुपरकिंग संघातून पिंपरी चिंचवड शहरातील ऋतुराज गायकवाड यानी IPL-2020 मध्ये चांगली कामगीरी केली आज सांगवी येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन सत्कार केला सोबत विश्वजीत बारणे,विजय साने,राजू कोतवाल.@ShivSena @AUThackeray @ShivsenaComms @IMyuvasena @ChennaiIPL @IPL pic.twitter.com/PKACq1iFol
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) November 7, 2020
ऋतुराजची आयपीएलमधील कामगिरी –
ऋतुराजसाठी या आयपीएल हंगामाची सुरुवात खास झाली नव्हती. तो दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला अन्य खेळाडूंपेक्षा अधिक काळ क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. ज्यामुळे तो आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर संघाशी जोडला गेला होता. तसेच त्याची सुरुवातीची कामगिरीही विशेष झाली नाही.
पण नंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने चेन्नईकडून शेवटच्या तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सलग ३ अर्धशतके करणारा चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला. त्याने चेन्नईकडून ६ सामने खेळताना ५१ च्या सरासरीने २०४ धावा केल्या. त्याचे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी तसेच फाफ डू प्लेसिसनेही कौतुक केले आहे. डू प्लेसिसने तर त्याला ‘युवा विराट कोहली’, असे संबोधले होते.
महाराष्ट्राकडूनही शानदार कामगिरी-
ऋतुराज महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. त्याने आत्तापर्यंत २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात ३८.५४ च्या सरासरीने ४ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३४९ धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४९च्या सरासरीने ५४ सामन्यात २४९९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ३४ टी२० सामन्यात १०४७ धावा केल्या आहेत. तसेच तो भारत अ संघाकडूनही खेळतो. त्याच्याकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणूनही पाहिले जाते.
आमदार लक्ष्मण जगताप यांनीही केला होता सत्कार –
गुरुवारी (५ नोव्हेंबर) आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऋतुराजच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला होता. तसेच त्याची आयपीएल कारकीर्द व क्रिकेट कारकिर्दीची माहिती घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गजाने निवडला सर्वोत्कृष्ट आयपीएल संघ; विराटला डच्चू तर सूर्यकुमार यादवला दिले ‘हे’ स्थान
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर सेहवागने घेतली फिरकी, म्हणाला ‘काकांच्या कॉमेडीची आठवण येईल’
विराट कोहली आरसीबीचा कर्णधार आहे, हे तर आमचे भाग्यच, पाहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख –
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?