---Advertisement---

गुवाहाटीत ऋतुचे ‘राज’! ऑसी गोलंदाजी झोडत टी20 शतकासह बनवले रेकॉर्डच रेकॉर्ड

On: मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023 8:48 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटी येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 225 धावा केल्या. भारतीय संघासाठी सलामीवी ऋतुराज गायकवाड यांनी तुफानी शतक झळकावले. त्याने केवळ 57 चेंडूंमध्ये 123 धावांची नाबाद खेळी केली‌.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. भारताने जयस्वाल व ईशान यांचे बळी तिसऱ्या षटकातच गमावले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने आक्रमक रूप धारण केले. दुसऱ्या बाजूने ऋतुराज सावधगिरीने खेळत होता. त्याने आपल्या पहिल्या 21 चेंडूवर केवळ 21 धावा बनवलेल्या. त्यानंतर त्याने मोठे फटके खेळत 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

https://twitter.com/BCCI/status/1729517205166162222?t=rheKbiKEduOvd9AiIW_6Ag&s=19

भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी घेत ऋतुराज नाही ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने 52 चेंडूंमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 57 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये शतक झळकावणारा तो नववा फलंदाज ठरला.

ऋतुराज हा भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. शुबमन गिल 126 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली 122 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर येतो.

(Ruturaj Gaikwad Hits International Cricket First Century Against Australia In Guwahati T20I)

महत्वाच्या बातम्या – 
तिसऱ्या टी20 पूर्वी सुट्टी घेत मुकेश कुमार पोहोचला घरी, ‘हे’ आहे कारण, चहर संघात सामील
INDvAUS: तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, अशी आहे प्लेईंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---