गुरुवारी (४ नोव्हेंबर) भारताची देशांतर्गत क्रिकेटमधील मोठी स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येत आहेत. आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाला जेतेपद मिळवून देणारा ऋतुराज गायकवाड हा सुद्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत देखील तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे.
ऋतुराज गायकवाड सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतोय. आयपीएल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी तो योग्यरीत्या पार पाडत आहे. तामिळनाडू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने तुफानी अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते. मात्र पंजाब संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाला सामनादेखील जिंकून दिला.
गुरुवारी (५ नोव्हेंबर) पंजाब संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने ५४ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ८० धावांची खेळी केली. हे त्याचे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी तामिळनाडू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याने तुफानी अर्धशतक झळकावले होते.
Rutu-al All day Everyday 💥#WhistlePodu #SyedMushtaqAliT20 🦁💛 pic.twitter.com/6lebstXUnd
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 5, 2021
या सामन्यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर पंजाब संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर गूरकिरत सिंगने ४१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर पंजाब संघाला २० षटक अखेर ६ बाद १३७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक सर्वाधिक ८० धावांची खेळी केली तर, आजिम काजिने २८ धावांचे योगदान दिले. हा सामना महाराष्ट्र संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
फॉर्मात परतलेल्या रोहितची बॅट स्कॉटलँडविरुद्ध ओकणार आग! अर्धशतक करताच बनेल ३ हजारी मनसबदार
इतका राग…! झेल सुटला म्हणून गोलंदाजाची आपल्याच सहकाऱ्याला भर मैदानात शिवीगाळ, पाहा व्हिडिओ
नामिबियाला धूळ चारत सेमीफायनलचा मार्ग सोपा करण्यावर न्यूझीलंडची नजर, पराभूत झाल्यास भारताचा फायदा