---Advertisement---

ऋतुराजला संघात पुन्हा स्थान मिळणे कठीण!, ‘ही’ आहेत त्याची प्रमुख कारणे

On: सोमवार, जून 13, 2022 10:10 PM
Ruturaj-Gaikwad
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात सुरू असलेल्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवार दिनांक १२ जून रोजी कटक येथील बाराबती स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने भारतावर ३ गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या काही खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. ज्यातील प्रमुख नाव म्हणजे ऋतुराज गायकवाड.

मालिकेत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) काही खास करु शकला नाही. त्याने या मालिकेत खेळल्या गेलेल्या २ सामन्यात मिळुन फक्त २४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळवून देण्यास तो अपयशी ठरला आहे. ऋतुराजने आयपीएल २०२१ मध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत ऑरेंज कॅप जिंकली होती. त्याच्या या प्रदर्शनामुळे चेन्नई सुपरकिंग्सने चौथ्या वेळा आयपीएल २०२१ चे चषक जिंकले. यानंतर मात्र त्याला भारतीय संघामध्ये पहिल्यांदा जागा मिळाली. तेव्हापासून त्याने ५ टी-२० सामने खेळले आहेत आणि एकाही सामन्यात त्याने २५ पेक्षा धावा बनवल्या नाहीत. त्यामुळे येत्या काही सामन्यातून तो बाहेर होऊ शकतो.

याआधी खेळल्या गेलेल्या ३ टी-२० सामन्यात त्याने अनुक्रमे २१,१४ आणि ४ धावा केल्या आहेत. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे त्यासाठी संघ व्यवस्थापनेने युवा खेळाडूंना संधी देत आहे, परंतु ऋतूराज यात अपयशी ठरला आहे. दुसरीकडे ईशान किशन पहिल्या सामन्यात महत्वपुर्ण ७६ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या सामन्यात ताबडतोड २९ धावा बनवून बाद झाला. तसेच, आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करुन सुद्धा त्याला भारतीय संघात संधी मिळत नाहीये. अशांतच आता आगामी काळात ऋतुराजला संघात स्थान मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत.

दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये सुद्धा ऋतुराजच प्रदर्शन काही खास नव्हते. ऋतुराजला आयपीएल २०२२च्या लीलावापूर्वी चेन्नईच्या संघाने प्रमुख ४ खेळाडूंमध्ये रिटेन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चेन्नईने टाकलेला विश्वास ऋतुराज सार्थ ठरवू शकला नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- 

व्हीव्हीएस लक्ष्मण असणार भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा काय आहे कारण

BIG NEWS। बीसीसीआयने माजी क्रिकेपटूंना दिला मोठा दिलासा, मासिक पेन्शनमध्ये केली तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

पार्नेलने पंड्याला दिलेला ‘प्रेमाचा’ निरोप चांगलाच गाजलाय!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---