युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने न्यूझीलंड विरुद्ध १७ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या मायदेशातील टी मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून त्याचे आयपीएल पदार्पण केले होते आणि त्यानंतर भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पदर्पण केले होते. तत्पूर्वी आयपीएलमध्ये पहिल्या वर्षी खेळताना त्याची सुरुवात काही खास राहिली नव्हती. अशात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले होते. ऋतुराजने स्वतः या प्रसंगाची माहिती दिली आहे.
साल २०२० मध्ये जेव्हा सीएसके संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला होता, तेव्हा संघाने ऋतुराजला सलामी करण्याची संधी दिली होती आणि ऋतुराजनेही त्याचा फायदा घेत सलग तीन सामन्यात अर्धशतक झळकावले होते. यापूर्वी एमएस धोनीने त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि संघातील स्थानाविषयी चिंता करू नको असे सांगितले होते.
ऋतुराजने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा आम्ही स्पर्धेच्या बाहेर झालो, तेव्हा मला पुन्हा मुंबई इंडियमन्सविरुद्ध सलामी करण्याची संधी मिळाली. मी जास्त धावा नाही केल्या, पण धोनीने चालता चालता माझ्याशी चर्चा केली. त्यानी मला सांगितले की, ‘तुला संघात तुझ्या जागेविषयी चिंता करण्याची गरज नाही.’ त्यानी सांगितले की, हे माझ्यासाठी कठीण असेल आणि सीएसके व्यवस्थापनाला माहीत आहे की, तुझ्यामध्ये काय प्रतिभा आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये तू कसे प्रदर्शन केले आहे. त्यांनी मला सीएसकेसाठी आनंद घेऊन खेळण्यासाठी सांगितले.”
“त्या शब्दांनी माझ्यात विश्वास भरला आणि मला दाखवले की, कर्णधार आणि फ्रेंचायझीने माझ्यावर किती विश्वास ठेवला. यामुळे मला स्वतःला शांत करण्यामध्ये मदत मिळाली; कारण मला समजले की, धोनी माझे समर्थन करत आहे. त्यामुळी मी मैदानावर माझ्या वेळेचा आनंद घ्यायला सुरुवात केली आणि मोकळेपणाने फलंदाजी करू लागलो. त्यामुळे माझ्यातील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन बाहेर येते. या आयपीएलविषयी बोलायचे तर, मला माझ्या क्षमतांवर विश्वास होता. होय, मला हे माहीत नव्हते की, ऑरेंज कॅप घालेल,” असेही ऋतुराज पुढे बोलताना म्हणाला.
ऋतुराजने त्याचा देशांतर्गत क्रिकेटमधील चांगला फॉर्म कायम ठेवून आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. स्पर्धेच्या शेवटी यासाठी तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. चेन्नई सुपर किंग्जला मिळालेल्या विजेतेपदामध्येही ऋतुराजने मोलाची भूमिका पार पाडली होती. तसेच सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील ऋतुराजने महाराष्ट्राचे नेतृत्व करताना चांगली कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
अमेरिकेला मिळू शकते २०२४ टी२० विश्वचषकाचे यजमानपद, ‘हे’ आहे मोठे कारण
भारतीय संघाबरोबरचा प्रवास संपल्यानंतर आता ‘या’ लीगमध्ये शास्त्री दिसणार आयुक्तांच्या भूमिकेत
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…