चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चमकला. ऋतुराजने या सामन्यात दमदार फलंदाजी करत आयपीएल 2023 मधील पहिले अर्धशतक पूर्ण करण्याचा मान पटकावला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिले शतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो नर्व्हस नाईंंनटीजचा शिकार ठरला. आयपीएल कारकीर्दीत त्याच्यावर नर्व्हस नाईंंनटीजमध्ये बाद होण्याची दुसऱ्यांदा वेळ आली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईची सुरुवात जरा खराब झाली. संघाला 14 धावांवर डेवॉन कॉनवेच्या रूपात पहिला झटका बसला. मात्र, सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने एका बाजूने संघाची खिंड लढवत तुफानी अर्धशतक पूर्ण केले.
त्याने केवळ 23 चेंडूवर हा टप्पा पार केला. यात त्याने 3 चौकार आणि 5 षटकारही ठोकले. अर्धशतकानंतरही त्याची बॅट थंडावली नाही. त्याने विरोधी गोलंदाजांवर आक्रमण सुरू ठेवत संघाच्या धावा वाढवल्या. बाद होण्यापूर्वी त्याने 50 चेंडूंमध्ये 92 धावा कुटल्या. यामध्ये 4 चौकार व 9 षटकारांचा समावेश होता. ऋतुराज आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांना नर्व्हस नाईंंनटीजचा शिकार ठरला.
ऋतुराज यापूर्वी मागील वर्षी शतक झळकावण्यात अपयशी ठरलेला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 57 चेंडूवर 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने त्याने 99 धावा केल्या होत्या.
(Ruturaj Gaikwad Out Second Time In Nervous 90s In IPL Carrier)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023 । कर्णधार रोहितवर जोफ्रा आर्चर पडतोय भारी, नेट्समध्ये करतोय कहर गोलंदाजी
वयाच्या 32व्या वर्षीय इंग्लंडचा दिग्गज करतोय आयपीएल पदार्पण, पण सोप्पा नसेल मार्ग; वाचा सविस्तर